● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Tuesday 6 August 2019

ITR भरताना चूक केलीत तर ती 'अशी' सुधारा

ITR भरताना चूक केलीत तर ती 'अशी' सुधारा

इन्कम टॅक्स भरताना खूप सावधपणे फाॅर्म भरावा लागता. तरीही काही तरी चूक राहतेस. मग अशा वेळी चिंता करू नका. कारण ती चूक सुधारता येते. तुम्ही शेवटच्या तारखेआधी ITR भरला असलात तर रिवाइज करण्यासाठी टेंशन घ्यायची गरज नाही.

तुम्ही वेळेत रिटर्न भरला तर तो रिवाइज करण्यासाठी तुमच्याकडे बराच वेळ असतो. रिविजन करायचा असेल तर रिटर्न वेरिफाय करू नका. नाही तर मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लगेच प्रोसेसमध्ये टाकतो. म्हणून रिविजन करायची संधी ठेवा. म्हणजे तुम्ही चुका सुधारू शकता आणि तुम्हाला दंड पडणार नाही.

ITR रिवाइज कसा करायचा??

तुम्ही ITR ऑनलाइन भरला असाल तर तुम्हाला रिवाइज्ड फाॅर्ममध्ये रिटर्न भरल्याचा अकनाॅलेजमेंट नंबर आणि रिटर्न भरला असल्याची तारीख फाॅर्ममध्ये भरा. तुम्ही दुसऱ्यांदा रिवाइज करत असाल तर पहिलाच नंबर आणि तारीख भरावी लागेल. तुम्ही ऑफलाइनही भरू शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला 15 अंकी अकनाॅलेजमेंट नंबर पाठवतं.

ऑनलाइन रिटर्न वेरिफाय नेटबँकिंग किंवा आधार ओटीपीसह केला जातो. त्यातली चूक सुधारली की तुम्ही निश्चिंत राहता.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आता 31 जुलै किंवा वाढीव ऑगस्ट असते. या महिन्यात ITR भरण्याची घाई करावी लागेल. पण त्या घाईत काही गोष्टी तुम्ही रिटर्नमध्ये दाखवल्या नाहीत तर नक्की अडचणीत याल.

हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवायचं अनेकदा राहून जातं. ते दाखवणं आवश्यक आहे.

ITR फाइल करताना सेव्हिंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणारं व्याजही दाखवावं लागतं. त्याचाही हिशेब द्यावा लागतो.

तुम्ही तुमच्या छोट्यांच्या नावे केलेली गुंतवणूक एका वर्षात 1500 रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पण ती या रकमेच्या पुढे जात असेल तर मग ITR मध्ये दाखवावी लागेल.

                            --//--

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर