● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

शालेय समित्या
















🔘

शालेय समित्यांची रचना

● शाळा व्यवस्थापन समिती
1 मुख्याध्यापक
2 पालक प्रतिनिधी
3 शिक्षण तज्ज्ञ / शिक्षण प्रेमी
4 स्थानिक संस्था प्रतिनिधी
5 शिक्षक प्रतिनिधी
6 विद्यार्थी प्रतिनिधी
7 विद्यार्थीनी प्रतिनिधी

● शिक्षक पालक संघ
1 मुख्याध्यापक
2 शिक्षक प्रतिनिधी
3 पालक प्रतिनिधी
4 प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

● माता पालक संघ
1 मुख्याध्यापक
2 शिक्षक प्रतिनिधी
3 पालक प्रतिनिधी
4 प्रत्येक वर्ग-पालक प्रतिनिधी

● शालेय परिवहन समिती
1 मुख्याध्यापक
2 वाहतुक निरीक्षक
3 शिक्षण विभाग प्रतिनिधी/शिक्षण निरीक्षक
4 वाहतुक पोलिस निरीक्षक / पोलिस निरीक्षक
5 स्थानिक संस्था प्रतिनिधी
6 बस मक्तेदार प्रतिनिधी
7 शिक्षक पालक संघ प्रतिनिधी

● मध्यान्ह पोषण आहार समिती
1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
2 तलाठी / ग्रामसेवक
3 विस्तार अधिकारी ( शिक्षण )
4 आरोग्य सेवक / सेविका
5 मुख्याध्यापक
6 केंद्रिय मुख्याध्यापक

👏

शाळा व्यवस्थापन समिती
 जबाबदा-या व कार्य

● शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
● शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.
● शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.
● गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.
● शालेय पोषण आहार योजना इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.
● शालेय मंत्रिमंडळ / बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.
शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.
● शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.
● शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणा-या अडचणीचे निरसन करून शाळेचा विकास करणे.
● शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
● महिन्यातून किमान एक बैठक घेणे , बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.

🌟

रचना
1)शाळा व्यवस्थापन समिती-रचना

● ७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता,पिता /पालक)
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी, शिक्षक,शिक्षकतज्ञ यांमधून निवड करणे.

● किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून(१मुलगा,१मुलगी)
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे.

● शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव

● विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे माता/पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व

● समिती दर २ वर्षांनी पुनर्गठीत करणे.

● समितीची महिन्यातून किमान १ बैठक

2)माता -पालक संघ -रचना
1. अध्यक्ष -मुख्याध्यापक
2. सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक(स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )
3. सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )

 3)पालक शिक्षक संघ -रचना
1. अध्यक्ष -प्राचार्य /मुख्याध्यापक
2.उपाध्यक्ष -पालकांमधून एक
3.सचिव -शिक्षकांमधून एक
4.सहसचिव (२)-पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
5.सदस्य -प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
6.प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
7.समितीत ५०%महिला सदस्य
8.समितीची मुदत २ वर्षे
9.बैठक २ महिन्यातून किमान एक


शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात सूचना
● नवीन शाळा व्यवस्थापन समिती ही सप्टेंबर महिन्यात स्थापन करणे आवश्यक आहे,बंधनकारक आहे.त्यासाठी प्रत्येक पालकापर्यंत सूचना पोचणे आवश्यक आहे.

● 7 दिवस पूर्वी पालकसभेची सूचना काढणे;त्यानंतर 7 दिवसांनी  पालकसभा घेणे,पालकसभेतून वर्गनिहाय, आरक्षणनिहाय,महिलांसहीत सदस्य निवड लोकशाही पद्धतीने बहुमताने करणे.

● जास्त संख्या असलेल्या शाळांनी प्रत्येक मुलाकडे पालकाची सही आणण्यासाठी छोट्या सूचनेचा कागद देणे,सही घेणे,सर्व कागद गोळा करणे.

● पालकसभा घेताना 50%पेक्षा जास्त हजर पालकांच्या सह्या बैठकरजिस्टरवर असाव्यात.

● या बैठकीला तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील इ.ना पत्र देऊन हजर राहण्याची विनंती करावी... किंवा गरजेनुसार पोलिस स्टेशनला अर्ज देऊन एखादा पोलिस कर्मचारी मागून घ्यावा.

● शा.व्य.समिताचा अध्यक्ष प्रत्यक्ष मुलाचे आई किंवा वडीलच असले पाहिजे.इतर नातेवाईकांना अध्यक्ष होता येत नाही.

● ही समिती 1आँक्टोबर 2018पासून ते 30सप्टेंबर 2020पर्यंत काम पाहील.

● एखादा निवडलेला सदस्य किंवा अध्यक्ष याचे मूल काही कारणाने शाळा सोडून गेले तर त्याचे सदस्यत्व/अध्यक्षपद आपोआपच रद्द होईल, अशी सूचना लेखीमध्ये घ्यावी.

● प्रत्येक वर्गातून 1पुरुष व 1महिला सदस्य निवडावा. 

● 1मुलगा,1मुलगी(शाळेतून);1शिक्षक,
1ग्रामपंचायत सदस्य,1शिक्षणप्रेमी नागरिक हे बिगर निवडणुकीतून आलेले सदस्य असतील.
मुअ हे पदसिद्ध सचिव असतील.

● कुठल्याही परिस्थितीत30सप्टेंबर2018पर्यंत नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन झालीच पाहिजे.

टीप:- येथे नमुना सूचना दिल्या आहेत.
प्रत्यक्षात शा.व्य.समिती जी.आर.प्रमाण मानावा.





No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर