● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

ओवी, म्हणी व गीते


◆ ओवी ◆

  • सासरी जाते लेकं, आईची ओढाताड
  • बापाचा जीवं वेडा, अंगी भिडविला घोडा.
  • सासरी जाते लेकं, मायलेकं गळी पडे,
  • कोरडया नदीला, ओला पाझर फुटे.
  • घे गं आई चोळी, मला लहानं काठाची,
  • मोठं माझं गावं, वस्ती अडाणी लोकांची.
  • घे गं आई चोळी, मला हिरवीगारं,
  • मोठं माझं गावं,वस्ती अडाण्याची फारं.
  • पहाटे दळणं, मायलेकीला साजतं,
  • सखी पुसती सखीला, कुठं अलगूजं वाजतं.
  • दुरल्या देशीचं पत्र, घेते मी धावून,
  • माझ्या गं बाळानं, कायं धाडीलं लिवूनं
  • दुरल्या देशीचं पत्र, घेते घाई-घाई,
  • माझ्या गं बाळान, काय लिहिलं बाई.
  • सपान पडीले, उठून आले दारी,
  • माझ्या बाळावाणी, मला कोण हाका मारी.
  • माझ्या गं बाळान, काय कामं केल, 
  • उचलला नांगर, मातीच केल सोन.
  • जाईनं शेताला, उभी राहीन बांधाला,
  • माझ्या गं बाळची, जाते कमाई पाहायला.
  • पंढरीला जाते,पहिली पायरी नामाची,
  • विठ्ठलाच्या आधी,भेट गरुड खांबाची.
  • चंद्रभागेला गं पुरं,पाणी लागलं वडाला,
  • रुख्मिनी म्हनं,माझा पुंडलिकं बुडाला.
  • चंद्रभागेला गं पुरं,नावेचा घोडा बुड,
  • राही रुख्मिनं पतीव्रता, व्हय पुढ.
  • इथून पंढरी, दिसती गं लालं-लालं,
  • देव विठ्ठलाची, पिकली गं मखमलं.
  • इथूनं पंढरी, दिसती गं निळी-निळी,
  • देव विठ्ठलाची, पिकली गं सोनकळी.
  • पंढरीची वाट,कशान गं काळी झाली,
  • देव विठ्ठलाच्या,बुक्क्याची गं गाडी गेली.
  • तुळसं-तुळसं,तुला नाही आई-बाप,
  • चाल माझ्या वाड्या,जागा देते अंगणात.
  • जिला नही लेकं,तिनं तुळसं लावावी,
  • येरंझरा घाली, तिचा गोविंद जावई.
  • तुळशीचा पाला,गेला सगळा वा-यानं,
  • देवं विठ्ठलानी,गोळा केला आवडीनं.
  • तुळसं-तुळसं,झाली वाळूनं कोळं,
  • देवं विठ्ठलानं,कंठीला केली माळं.
  • रुख्मिनं म्हनं,देवा आवड कोणाची,
  • तुळसं गुणाची, दारी तळती उन्हाची.
  • पंढरीला जाते,संग आईचं पातळं,
  • चंद्रभागातीरी पाणी,धुवाया नितळं.
  • पंढरीला जाते,संग आईची गं चोळी,
  • चंद्रभागातीरी आहे,धुवाया मोठी तळी.
  • भरताराचं सुखं,नारं सांगते आईला,
  • शंकर शेल्याची,केली सावली जाईला.
  • भरताराचं सुखं,नारं सांगते गणगोताला,
  • शंकर शेल्याची,केली सावली शेताला.
  • भरताराचं सुखं,सांगते दोघी-तिघी,
  • गाठ पाषाणाची,मैना माझी दूर उभी.
  • डोईचा पदरं,माझा वसरी पांगला,
  • देरं मरंजीचा माझा,नही पायरी यंगला.
  • नंदई रे भाऊ, तुझं-माझं कायं नातं,
  • तुला रे दिली ना,चुड्याची रे पाठ .
  • नणंद परीसं,माझा नंदई चांगला,
  • चोळी पातळाची घडी,माझा मांडव यंगला.
  • लाडाची लेकं,लई दिसं नसावी माहेरी,
  • धन्याची कोथंबिर, वासं मळ्याच्या बाहेरं.
  • नांद-नांद लेकी,नांदुनं कर नावं,
  • तुझ्या गं भोवताली,माझ्या सोय-याचं गावं.
  • दळण दळीते,जसं हरिण पळतं,
  • आई तुझं दुधं,माझ्या मनगटी खेळतं.

जयश्री विलास गांगुर्डे
मु. पो. खेडगाव, दिंडोरी, नाशिक.




◆ पाळणा गीत ◆


बाळा जो जो रे, कुळभूषणा, । श्रीनंदनंदना ॥ 

निद्रा करिं बाळा, मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा धृ.॥ 

जन्मुनि मथुरेत, यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥ 

पाळणा लांबविला, गोकुळीं । धन्य केले गौळी ॥ बाळा जो.॥ 

बंदीशाळेत, अवतरूनी । द्वारे मोकलुनी ॥ 

जनकशृंखला, तोडोनी । यमुना दुभंगोनी ॥ बाळा जो. ॥ 

मार्गी नेताना, श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥ 

शेष धावला, तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥ बाळा जो. ॥ 

यत्नजडित, पालख । झळके अमोलिक ॥ 

वरती पहुडले, कुलतिलक । वैकुंठनायक ॥ बाळा जो. ॥ 

हालवी यशोदा, सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ॥ 

पुष्पें वर्षिली, सुरवरी । गर्जती जयजयकारीं ॥ बाळा जो. ॥ 

विश्वव्यापका, यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥ 

तुजवरिं कुरवंडी, करूनियां । सांडिन मी निज काया ॥ बाळा जो.॥ 

गर्ग येऊनि, सत्वर । सांगे जन्मांतर ॥ 

कृष्ण परब्रह्म, साचार । आठवा अवतार ॥ बाळा जो. ॥ 

विश्वव्यापी हा, बाळक । दुष्ट-दैत्यांतक ॥ 

प्रेमळ भक्तांचा, पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥ बाळा जो. ॥ 

विष पाजाया, पूतना । येतां घेईल प्राणा ॥ 

शकटासुरासी, उताणा । पाडिल लाथें जाणा ॥ बाळा जो. ॥ 

उखळाला बांधिता, मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥ 

यमलार्जुनांचे, उध्दरण । दावानलप्राशन ॥ बाळा जो. ॥ 

गोधन राखितां, अवलीळा । काळीया मर्दीला ॥ 

गाई गोपाळां, रक्षून । केलें वनभोजन ॥ बाळा जो. ॥ 

कालिंदीतीरी, जगदीश । वज्रवनितांशी रास ... ॥ 

खेळुनी मारिले, कंसास । मुष्टिक चाणूरास ॥ बाळा जो.॥ 

ऐशी चरित्रे, अपार । दावुनि भूमीवर ॥ 

पांडव रक्षिल, सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥ बाळा जो.॥






◆ लग्नाचे गाणे ◆


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या नथासाठी, मोडं खजिना.


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या डुलासाठी, मोडं खजिना.


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या पैंजनासाठी, मोडं खजिना.


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या बांगडीसाठी, मोडं खजिना.


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या लेणसाठी, मोडं खजिना.


गाडी गुलाबी, बैलं खिलारी,

भाऊ सजना, दादा सजना,

बहिणीच्या चोळीसाठी, मोडं खजिना.







दिवाळीची गाणी


दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवळी
गायी म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या
नरशा आला पिवून गेला
खंडोबाच्या आड लपला
खंडोबाचं तोंड तुटलं
त्याच्या मागं घोडं सुटलं
घोडयाला होती लगाम दोरी
कान्ह्या भिल्ल हाती धरी
काळा कुट्ट कान्हया भिल्ल
त्याच्या कमरेला सात तीळ
एक तीळ उपसिला
बगलेला मारुन हल्ला केला
समोर गावाचा पाटील दिसला
पाटील बघून सलाम केला
अच्चल काठी
अच्चल काठी, मच्चल काठी
गई का वेली, डुबा झाला
घरचा धनी हारकला
पाची बोटं चिराकली
एक चिरका फाटुन गेला
त्येच्या झाल्या बारा बात्या
मागं म्होरं चंदर ज्योत्या!
एक हुती बाग बाग
तिथं हुता नाग
नागाची फडी फडी
वाघाची ऊडी
वाघाचं किराण किराण
रेडयाच धराण
वाघाचा पाई पाई
गया जमल्या लई
एक गई कूशी कूशी
पाण्यात बसल्या म्हशी
म्हशीच शिंग शिंग
लावा दिवाळीला भिंग




No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर