● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

व्यक्तिविशेष:- अल्प परिचय



  • अब्राहम लिंकन
जन्म दिनांक: १२ फेब्रुवारी १८०९
मृत्यू दिनांक: १५ एप्रिल १८६५
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: वकील, राजकारणी
अल्प परिचय: अब्राहम लिंकन हे अमेरिकेतील प्रभावशाली राष्ट्रपतींपैकी एक गणले जातात. ते अमेरिकेचे १६वे राष्ट्रपती होते, त्यांचे जीवन खडतर संघर्षानंतर मिळालेल्या यशाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत गरिबी ते व्हाइट हाउस पर्यंतचा प्रवास करणारे अब्राहम लिंकन दोन वेळा सीनेटच्या निवडणूकीत पराभूत झाले होते. यासाठी जीवनात काही मिळवायचे असेल तर हार न मानता सातत्याने पुढे चालत रहावे हा सकारात्मक विचार अब्राहम लिंकन यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतो.



  • ॲडॉल्फ हिटलर
जन्म दिनांक: २० एप्रिल १८८९
मृत्यू दिनांक: ३० एप्रिल १९४५
राष्ट्रीयत्व: जर्मन
कार्यक्षेत्र: राजकारणी
अल्प परिचय: ॲडॉल्फ हिटलर विसाव्या शतकातील जर्मनीचे हुकूमशहा होते. ॲडॉल्फ हिटलर जर्मनीच्या नाझी पक्षाचे प्रमुख होते, दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत यांची गणना होते. हिटलर त्यांच्या क्रूरता व ज्यूंच्या कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे मात्र ते एक उत्तम चित्रकार देखिल होते. ॲडॉल्फ हिटलर हे एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नते होते. ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज’, हे त्यांचे घोषवाक्य होते. ‘माईन काम्फ’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.



  • अॅल्बर्ट आइन्स्टाइन
जन्म दिनांक: ४ मार्च १८७९
मृत्यू दिनांक: १८ एप्रिल १९५५
राष्ट्रीयत्व: जर्मन (१८७९ - १८९६, १९१४ - १९३३), स्विस (१९०१ - १९५५), अमेरिकन (१९४० - १९५५)
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञान
अल्प परिचय: अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे.


  •  आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन
जन्म दिनांक: ६ ऑगस्ट १८०९
मृत्यू दिनांक: ६ ऑक्टोबर १८९२
राष्ट्रीयत्व: ब्रिटिश
कार्यक्षेत्र: राजकवी
अल्प परिचय: आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन हे इंग्रजी भाषेतील एक सर्वात लोकप्रिय कवी होते.



  • अण्णा भाऊ साठे
जन्म दिनांक: १ ऑगस्ट १९२०
मृत्यू दिनांक: १८ जुलै १९६९
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: लेखक, समाजसुधारक
अल्प परिचय: अण्णा भाऊ साठे हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारे, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेले सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. 



  • ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म दिनांक: १५ ऑक्टोबर १९३१
मृत्यू दिनांक: २७ जुलै २०१५
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: प्राध्यापक, लेखक, एरोस्पेस शास्त्रज्ञ
अल्प परिचय: ए. पी. जे. अब्दुल कलाम हे २५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७ या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.



  •  बाबासाहेब आंबेडकर
जन्म दिनांक: १४ एप्रिल १८९१
मृत्यू दिनांक: ६ डिसेंबर १९५६
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक
अल्प परिचय: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.




  • बराक ओबामा
जन्म दिनांक: ४ ऑगस्ट १९६१
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: राजकारणी, अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष
अल्प परिचय: बराक ओबामा हे अमेरिकेचे ४४ वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी २० जानेवारी २००९ रोजी पदग्रहण केले. ९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.



  • महात्मा गांधी
जन्म दिनांक: २ ऑक्टोबर १८६९
मृत्यू दिनांक: ३० जानेवारी १९४८
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: वकिल, तत्त्वज्ञ, नेते
अल्प परिचय: मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.




  • वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज
जन्म दिनांक: २७ फेब्रुवारी १९१२
मृत्यू दिनांक: १० मार्च १९९९
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: साहित्यीक, कवी
अल्प परिचय: वि. वा. शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे त्यांचे वर्णन कले जाते.



  • साने गुरूजी
जन्म दिनांक: २४ डिसेंबर १८९९
मृत्यू दिनांक: ११ जून १९५०
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक
अल्प परिचय: साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, हिमालयाची शिखरे, क्रांती, समाजधर्म, आपण सारे भाऊ इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.



  • स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म दिनांक: १२ जानेवारी १८६३, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत
मृत्यू दिनांक: ४ जुलै १९०२, बेलूर, कोलकाता, भारत
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: धर्मोपदेशक, नेते, संत
अल्प परिचय: स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.


  • जे. आर. डी. टाटा
जन्म दिनांक: २९ जुलै १९०४
मृत्यू दिनांक: २९ नोव्हेंबर १९९३
राष्ट्रीयत्व: भारतीय, फ्रेंच
कार्यक्षेत्र: भारतीय वैमानिक, उद्योजक
अल्प परिचय: जे.आर.डी. टाटा यांचे पुर्ण नाव जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.



  • कल्‍पना चावला
जन्म दिनांक: १७ मार्च १९६२
मृत्यू दिनांक: १ फेब्रुवारी २००३
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: अंतराळवीर
अल्प परिचय: भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या कल्पना चावला या पहिल्या अमेरिकन अंतराळवीर होत्या.


  •  लोकमान्य टिळक
जन्म दिनांक: २३ जुलै १८५६
मृत्यू दिनांक: १ ऑगस्ट १९२०
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते, स्वातंत्र्यसेनानी
अल्प परिचय: लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी होते, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.



  • बुद्ध
जन्म दिनांक: इ.स.पू. ५६३
मृत्यू दिनांक: इ.स.पू. ४८३
राष्ट्रीयत्व: -
कार्यक्षेत्र: तत्त्वज्ञ
अल्प परिचय: ‘बुद्ध’ हे नाव नाही ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक, तत्त्वज्ञ होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होते. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.


  • बोनी ब्लेयर
जन्म दिनांक: १८ मार्च १९६४
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: खेळाडू, स्पीड स्केटिंग
अल्प परिचय: बोनी ब्लेयर या एक निवृत्त अमेरिकन स्पिडस्केटर आहे. त्यांच्या काळातील त्या एक अव्वल स्केटिंगपटू होत्या आणि ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात सुशोभित खेळाडू देखिल होत्या. बोनी ब्लेयर यांनी पाच सुवर्ण पदके व एक कांस्य पदक मिळवले आहे.



  • बिल गेट्स
जन्म दिनांक: २८ ऑक्टोबर १९५५
मृत्यू दिनांक: -
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: व्यापारी, गुंतवणूकदार, लेखक, समाजसेवक
अल्प परिचय: बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. अमेरिकन व्यवहारिक जगतात त्यांचा मोठा वाटा आहे तसेच परोपकरी (मदत करणारे) म्हणुनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत.


  •  धीरूभाई अंबाणी
जन्म दिनांक: २८ डिसेंबर १९३२
मृत्यू दिनांक: ६ जुलै २००२
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: उद्योजक
अल्प परिचय: धीरूभाई अंबाणी हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला.



  • जॉर्ज बर्नार्ड शॉ
जन्म दिनांक: २६ जुलै १८५६
मृत्यू दिनांक: २ नोव्हेंबर १९५०
राष्ट्रीयत्व: आयरिश
कार्यक्षेत्र: साहित्य
अल्प परिचय: जॉर्ज बर्नार्ड शॉ हे आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्‍द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई.




  • गोपाल दांडेकर
जन्म दिनांक: ८ जुलै १९१६
मृत्यू दिनांक: १ जून १९९८
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: कादंबरीकार, ललितलेखक
अल्प परिचय: गोपाल नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते, तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.



  • गोविंद पानसरे
जन्म दिनांक: २६ नोव्हेंबर १९३३
मृत्यू दिनांक: २० फेब्रुवारी २०१५
राष्ट्रीयत्व: भारतीय
कार्यक्षेत्र: मार्क्सवादी, वकील, लेखक, सामाजिक कार्यकर्ते
अल्प परिचय: गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते. २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबई मध्ये निधन झाले. २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे तिकिट प्रकाशित केले.




  • हेन्री फोर्ड
जन्म दिनांक: ३० जुलै १८६३
मृत्यू दिनांक: ७ एप्रिल १९४७
राष्ट्रीयत्व: अमेरिकन
कार्यक्षेत्र: उद्योगपती
अल्प परिचय: हेन्री फोर्ड हे अमेरिकन उद्योगपती होते, फोर्ड मोटर कंपनीचे ते संस्थापक होते.




  • आयझॅक न्यूटन
जन्म दिनांक: ४ जानेवारी १६४३
मृत्यू दिनांक: २० मार्च १७२७
राष्ट्रीयत्व: ब्रिटिश
कार्यक्षेत्र: भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ
अल्प परिचय: आयझॅक न्यूटन हे एक थोर इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले. गतिकीमध्ये त्यांनी तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले. गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली.





  • जेम्स अ‍ॅलन
जन्म दिनांक: २८ नोव्हेंबर १८६४
मृत्यू दिनांक: २४ जानेवारी १९१२
राष्ट्रीयत्व: ब्रिटिश
कार्यक्षेत्र: इंग्लिश साहित्यिक, लेखक, तत्त्वज्ञानी
अल्प परिचय: जेम्स अ‍ॅलन हे इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होते. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक “अ‍ॅज अ मॅन थिंकेथ” हे त्यांच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.








जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर