● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Monday 5 August 2019

'अशा' प्रकारे भरू शकता ITR, ऑनलाईन इन्कम टॅक्स

🔘 'अशा' प्रकारे भरू शकता ITR, ऑनलाईन इन्कम टॅक्स

👇🏻

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं कर भरणाऱ्यासाठी खास सुविधा सुरू केलीय. करदाते आता ई फायलिंगद्वारे रिटर्न फाइल करू शकतात. ही एक नवी सुविधा सुरू झालीय.

 https://www.incometaxindiaefiling.gov.in 

👆🏻या पोर्टलवर ही सेवा आहे. याला ई फायलिंग लाइट असं नाव दिलंय.

🔘 ई फायलिंग लाइट या नव्या सेवेचा वापर
👇🏻
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सांगितलं की, करदात्यांसाठी ई फायलिंग लाइट सुरू करतंय. तुम्ही होम पेजवर जाऊन ई फायलिंग लाइट बटण दाबून याचा वापर करू शकता. सर्व सेवांबरोबर ई फायलिंग पोर्टलला पोर्टल लाॅगइन बटन दाबून वापरता येईल.

🔘 करदात्यांनी एकदा आपल्या पेजवर ऑनलाइन आयकर रिटर्न आणि 26एएस भरणं आवश्यक आहे.

🔘 आधीचा भरलेला ITR पाहता येतो
👇🏻
करदाता पहिल्यांदा भरलेला रिटर्न किंवा एक्सएमएल फाॅर्म डाउनलोड करू शकतात. पहिल्यांदा भरलेला रिटर्न पाहू शकतात.

🔘 वर्कलिस्ट, प्रोफाइल सेटिंग, ई प्रोसिडिंगसारखे टॅब या नव्या ई फायलिंग लाइट टॅबवरून हटवले आहेत. यामुळे करदात्यांना ITR भरणं सोपं जाईल. 31 ऑगस्ट रिटर्न भरायची शेवटची तारीख आहे.

🔘 ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.

🙏🏻

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर