● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Friday 27 April 2018

महाराष्ट्र दिन


महाराष्ट्र राज्याची निर्मिती

 १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी भाषिकांचे राज्य बनावे ही मागणी फार जुनी होती.

ब्रिटिश काळात देशाच्या मुख्य प्रादेशिक विभागांना प्रांत असे म्हणत, हे प्रांत भाषिक तत्वानुसार निर्माण करावेत अशी मागणी ब्रिटिश काळातच वेगवेगळ्या  होऊन राहिली.

१९४६ साली बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यात यावे अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला.

त्याच साली मराठी भाषिक राज्य स्थापन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याच्या उद्देशाने (संयुक्त महाराष्ट्र परिषद) या नावाची सर्वपक्षीय संस्था स्थापन करण्यात आली.

१९४६ साली घटनापरिषद स्थापन झाली होती व घटनपरिषदेत काही सदस्यांनी भाषिक राज्याची मागणी केली.

घटनापरिषदेतील अनेक सदस्यांनी विशेषकरून दक्षिणेतील राज्यांच्या सदस्यांनी प्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन घटनपरिषदेने १९४८ साली श्री दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषिक राज्य समिती नेमली.

दार समितीने भाषिक राज्याच्या मागणीला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे मान्य केले. पण केवळ भाषा हेच तत्व प्रधान मानून प्रांतरचना करणे राष्ट्रहिताचे ठरणार नाही असा निष्कर्ष काढला.

महाराष्ट्राच्या एकीकरणासमोरील समस्या

महाराष्ट्र  राज्यनिर्मितीच्या मार्गात प्रमुख तीन समस्या एक विदर्भाचा प्रश्न, मराठवाड्याचा प्रश्न, मुंबईचा प्रश्न.

ब्रिटिश राजवटीत सिंध प्रांतापासून कारवारपर्यंत पसरलेला मुंबई प्रांत निर्माण करण्यात आला होता. या प्रांतात पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, व कोकण या मराठी भाषिक प्रदेशांचा समावेश होता. त्याचबरोबर गुजरातचाही समावेश होता.

मराठी भाषिक विदर्भाचा प्रदेश मध्य प्रांतात समावेश होता, मराठवाडा निजामाच्या संस्थानात समावेश होता.

मुंबई प्रांतातील मुंबईसह मराठी भाषिक प्रदेश आणि विदर्भ तसेच मराठवाडा यांचे एकीकरण घडून आणणे हे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे उद्दिष्ट होते.

त्यासाठी एकीकडे विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावेत यासाठी प्रयत्नांची गरज होती, दुसरीकडे महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या विरोधकांशी संघर्ष करण्याची गरज होती. तो संघर्ष म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन होय.

विदर्भाचा प्रश्न

ब्रिटीश काळात विदर्भाचा समावेश मध्य प्रांतात झाला होता. नागपूर ही त्या प्रांताची राजधानी होती. १९४० साली महाविदर्भ समिती स्थापन झाली.

बॅ रामराव देशमुख, बापूजी अणे, ब्रिजलाल बियाणी, इत्यादी वेगळ्या विदर्भाचे नेते होते. विदर्भाच्या नेत्यांनी ही भीती दूर करण्यासाठी आणि संयुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १९४७ साली [अकोला करार] करण्यात आला.

अकोला करारात संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ हा उपप्रांत असावा. विदर्भासाठी वेगळे विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ असावे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि विदर्भासाठी वेगळी वरिष्ठ न्यायालये असावीत, असे या करारात म्हटले गेले.

नागपूर करार 

१९५३ साली पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही प्रमुख नेत्यांनी मिळून नागपूर येथे नवीन करार केला.

भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, नाना कुंटे, हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते व रामराव देशमुख, शेषराव वानखेडे, गोपाळराव खेडकर, इत्यादी विदर्भातील नेते यांनी मिळून हा करार केला.

नागपूर करारातील तरतुदी

मुबई प्रांत, मध्य प्रदेश, आणि हैद्राबाद संस्थान यातील सर्व मराठी भाषिक प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र हे राज्य बनवावे व मुबई ही राज्याची राजधानी असावी.

वरील तीन प्रदेशामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याच्या आर्थिक साधनांचे वाटप केले जाते. मराठवाडा विभागाचा अविकसितपणा विचारात घेऊन त्या विभागाच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

तिनही विभागांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील व्यावसायिक, तांत्रिक, तसेच, विशेष प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये राखीव जागा असाव्यात.

प्रशासकीय सेवा आणि महामंडळे यात सर्व श्रेणीतील सेवकवर्गाची भरती करताना तीन विभागाच्या लोकसंख्या यांच्या प्रमाणात करण्यात आली.

मंत्रिमंडळ व प्रशासन विशिष्ट काळासाठी नागपूर येथून आपले कामकाज चालवेल तसेच दरवर्षी  विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला भरविण्यात यावे.

या कराराच्या आधारे विदर्भाचा समावेश महाराष्ट्रात होण्याचा मार्ग सुकर झाला. आणि १९५६ साली जेव्हा दवैभाषिक राज्य स्थापन झाले. तेव्हा त्यात विदर्भाचा समावेश करण्यात आला.

राज्यपुनर्रचना आयोग

भाषिक राज्ये निर्माण करण्याच्या मागणीला जोर चढत गेल्याने पाहून केंद्र सरकारने अखेर १९५२ साली राज्यपुनर्रचना आयोग नेमला.

फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष पं हृदयनाथ कुंझरू आणि के एम पण्णीकर हे इतर सदस्य होते. मुंबई प्रांतातील मराठी भाषिक, विदर्भ, व मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य अशी महाराष्ट्रातील नेत्यांची व जनतेची मागणी होती.

गुजरातमध्ये महागुजरात परिषद स्थापन करण्यात आली त्या परिषदेने मुंबई प्रांतातील गुजराथी भाषिक प्रदेश, कच्छ आणि सौराष्ट्र यांचे मिळून गुजरात राज्य बनवावे.

१९५३ साली आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला व देशाच्या इतर प्रदेशातील लोकांची भाषिक राज्ये यांची मागणी मान्य करण्यात आली. मात्र संयुक्त महाराष्ट्र व गुजरात राज्य निर्माण करण्याची मागणी मान्य केली नाही.

उलट आयोगाने महाराष्ट्र व गुजरात यांचे दवैभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस मागणी मान्य केली नाही.

मराठवाड्याचा समावेश दवैभाषिक राज्यात करावा, मात्र विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करावे अशा शिफारशी या आयोगाने केल्या.

आयोगाचा अहवाल महाराष्ट्रावर दुहेरी अन्याय करणारा होता. दवैभाषिक राज्य निर्माण करून महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याची मागणी नाकारली गेली. शिवाय विदर्भाचे राज्य निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली.

या अहवालाविरुद्ध १९५५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत हिंसक घटना घडल्या व दंगली झाल्या. २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. त्या दिवशी पंधरा लोक गोळीबारात मृत्युमुखी पडले.

दवैभाषिक राज्याचा प्रयोग

१ नोव्हेंबर १९५६ रोजी दवैभाषिक राज्याची स्थापना करण्यात आली. श्री यशवंतराव चव्हाण हे या राज्याचे मुख्यमंत्री बनले.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपर्यंत म्हणजे १ मे १९६० पर्यंत दवैभाषिक राज्याचा प्रयोग करण्यात आला.

१९५६ साली महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही दवैभाषिक राज्याविरुद्ध आंदोलन सुरु झाले त्यासाठी महागुजरात ' जनता परिषद '  स्थापन करण्यात आली.

१९५७ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसू लागला, आणि ३९६ सदस्यांच्या विधानसभेत २३५ जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाने लोकमताला योग्य तो प्रतिसाद दिला पाहिजे, न दिल्यास महाराष्ट्रातील असंतोष वाढत जाईल.

संयुक्त महाराष्ट्र समिती

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आयोगाच्या अहवाल विरोधात लढा देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी पुणे येथे विरोधी पक्षांची परिषद भरविण्यात आली. त्याचे अध्यक्ष श्री एस एम जोशी होते.

त्यासाठी विरोधी पक्षांची मिळून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रजा सोशलिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ, लाल निशाण गट, संयुक्त महाराष्ट्रवादी काँग्रेस जनपरिषद, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, मजदूर किसान पक्ष, हिंदू महासभा, रिव्होल्यूशनरी कम्युनिस्ट पार्टी, बोल्शेविक असे अकरा पक्ष सामील झाले.

याच काळात आचार्य अत्रे यांनी ' मराठा ' दैनिक सुरु केले. हे दैनिक म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्रच बनले.

या पार्श्वभूमीवर १९५७ ची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत १३५ पैकी १०२ जागा समितीला मिळाल्या.

महाराष्ट्र विधानसभेत समितीला १२८ जागा मिळाल्या आणि मुंबई शहरात समितीला चांगले यश मिळाले, त्यामुळे आता समितीचे बळ वाढले.

महाराष्ट्र राज्याची स्थापना

१९५७ च्या निवडणुकीत मिळालेल्या समितीच्या यशाने महाराष्ट्र राज्याची मागणी समोर आली. गुजरातमध्ये वेगळ्या गुजरात राज्यामध्ये आणि महाराष्ट्राची जनता  प्रकारे मागणी करत होती.

या समितीनुसार महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये निर्माण करावीत ही मागणी महाराष्ट्राच्या नेत्यांनी केंद्रातील नेत्यांना पटवून दिली.

गुजरातला आपली राजधानी वसविण्यासाठी महाराष्ट्राने दहा कोटी रुपये देण्याचे ठरविले.

१९५३ नागपूर करार झाला, या समितीने केलेल्या शिफारशी नुसार घटनेत ३७१ [२] हे कलम समाविष्ट करण्यात आले. आणि नागपूर करारातील काही तरतुदी त्यात घालण्यात आल्या.

यानंतर महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला, दवैभाषिक राज्य निर्माण होण्यासाठी विधिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला. आणि त्यानंतर संसदेने घटनादुरुस्ती करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये १ मे १९६० रोजी मुंबई येथे पं जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा पार पडला. 


                     ◆◆◆●◆◆◆

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

हुतात्मा स्मारक,मुंबई

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना


१ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतू बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतू या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. १९५७च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गांधीने नेहरुंचे मन वळवले. द्वैभाषिकची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याला गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.
तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरुंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना कामगारदिनी म्हणजे १ मे रोजी केली गेली. महाराष्ट्रस्थापनेचा कलश पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती


 १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.


              ◆◆◆◆◆●◆◆◆◆◆

महराष्ट्र कामगार कल्याण मंडळ



महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ आहे.

याची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF – महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) दर ६ महिन्यातून (जून व डिसेंबर) मंडळाला मिळते. या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ महाराष्ट्र राज्यातील सर्व आस्थापनांना लागू आहे. यात फॅक्ट्री अँक्ट १९४८ अंतर्गत येणारे सर्व कारखाने, बॉम्बे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट अँक्ट १९४८ अंतर्गत येणारी सर्व दुकाने व आस्थापना (ज्यामध्ये किमान ५ कामगार असावेत), आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स अँक्ट १९६१ अंतर्गत नोंदित आस्थापनांचा आहेत

उपक्रम
  • शिशुमंदिर
  • पाळणाघर
  • शिवणवर्ग (सरकारमान्य / मंडळाचा)
  • हस्तकला वर्ग
  • फॅशन डिझायनिंग वर्ग
  • ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण अभ्यासक्रम
  • संगणक प्रशिक्षण वर्ग
  • वाचनालय
  • ग्रंथालय
  • अभ्यासिका
  • व्यायामशाळा
  • योगावर्ग
  • धनुर्विद्या (आर्चरी)
  • टेबल टेनिस कोर्ट
  • बॅडमिंटन कोर्ट
  • जलतरण तलाव
  • कराटे प्रशिक्षण वर्ग
  • संगीत वर्ग
  • नृत्य वर्ग
  • चित्रकला वर्ग
  • ब्युटीपार्लर वर्ग                                       (स्थानिक कामगारांची मागणी, जागेची व तज्ज्ञांची उपलब्धता यानुसार विविध उपक्रम केंद्र स्तरावर राबविले जातात.)


कार्यक्रम

  • कामगार नाट्य स्पर्धा
  • महिला / बाल नाट्य स्पर्धा
  • लोकनृत्य स्पर्धा / भजन स्पर्धा
  • समगीत / स्फुर्तीगीत स्पर्धा
  • कामगार साहित्य संमेलन
  • कबड्डी स्पर्धा
  • कामगार केसरी / कुमार केसरी कुस्ती स्पर्धा
  • कामगार श्री – शरीर सौष्ठव स्पर्धा
  • कामगार नाट्यकर्मींचा सत्कार
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा सत्कार
  • शालांत परीक्षा मार्गदर्शन / करिअर गाईडन्स
  • स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
  • रोजगार मेळावा
  • स्वयंरोजगार / पुरक उद्योग / बचतगट प्रशिक्षण शिबिर
  • क्रीडा प्रशिक्षण शिबिर
  • नाट्य प्रशिक्षण शिबिर
  • दूर पल्याच्या सहली


            ★★★★★★★★★★★


Wednesday 18 April 2018

महात्मा बसवेश्वर



बहुजनांची वैदिकतेच्या गुलामीतून मुक्तीची पहाट म्हणजे महात्मा बसवेश्वराचा जन्म दिवस.

  
          देशाच्या अतिप्राचीन संस्कृतीचा इतिहास लोप पावला होता सनातनी वैदिक व्यवस्थेच मोठ्या प्रमाणावर स्तोभ माजल होत.माणूस म्हणून माणसाच्या जगण्याला काहीच अधिकार नव्हता,माणसाचं जीवन जणू किड्या-मुग्या प्रमाणे भरकटून टाकलं होत. तथागताच्या जाण्यानंतर जणू आपल्या अधिकारासाठी सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी कोणीच आवाज उठवायला तयार नव्हत.पण त्या गुलाम झालेल्या व्यवस्थेची पुन्हा घडी बसवण्यासाठी,स्वअस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी बहुजनांच्या मुक्तीचा समतासूर्य जगतज्योति महात्मा बसवेश्वराचा जन्म बाराव्या शतकात अक्षय तृतीयांच्या दिवसी झाला आणि सबंध मानवतेची अस्मिता जणू जागी झाली.
                       समाज कर्मकांड ,जातिव्यवस्था ,पुरोहितशाहीच्या गाढ झोपेत झोपला होता ह्या वेगवेगळ्या प्रश्नाला एकाच वेळी वाचा फोडणारे जगातल्या कृतिशील ज्ञानाच सगळ्यात मोठ विद्यापीठ म्हणजे बसवपीठ होय.अहंकाराने ,मी पणाने अनेक राजे,राजवाडे नको तशा प्रकारे शासन करत होते पण जगात कधी नोव्हें पहिल्यादाच सामान्य जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्याचे दुःख आपले दुःख समजून गोरगरीबाणा आपल्या उराशी घेऊन कवटाळून मिठी मारून लढणारा पहिला पंतप्रधान म्हणजे  विश्वगुरू महात्मा बसवेश्वर होत.अगदी लहानपणा पासूनच विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची ज्वलंत मशाल म्हणजे बसव जीवन होत.वयाच्या आठव्या वर्षी बहुदेव उपासनेवरून केलेला विरोध असो किंवा जातीव्यवस्थेवरून दैनंदिन जीवनात केला जाणाऱ्या भेदभावाला दिलेला छेद असो.त्यागा शिवाय महापुरुष होतच नाहीत महात्मा बसवेश्वरांनी या जुलमी साखळ धनडाना तोडण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी अक्कानागमा सोबत घराचा त्याग केला आणि तेथून पुढे कुडलसंगम येथे जाऊन जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्वच धर्माचा आणि त्याच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला. वेद, आगम,निगम,तर्क-वितर्क ह्या सर्वच संकल्पना पुरेपूर पने जाणून घेतल्या आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या सर्वच संकल्पना मध्ये स्पष्ठ मानव समाज पायदळी तुडवला जातोय ,येथे दिन-दलितांचा शोषण होतय ,या व्यवस्थेची सर्व सूत्र प्रस्थापित पुरोहित वर्गाकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले यासोबत सर्वच घडमोडी जवळून पाहत असताना अतिशय प्रगल्भ पणे महात्मा बसवेश्वराणा समजू लागलं की ही कपोलकल्पित व्यवस्था या मानवी समाजाला थोतःड स्वर्ग-नरक नावाच्या कल्पनाच्या भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर शोषण करतंय ह्या सर्वच प्रश्नांनानी त्याच मन अगदी कवळून ,पेटून उठलं होत ह्यांच्या स्वार्थी आणि बरबटलेल्या अवस्थेतुन समाजाला बाहेर काढण्यासाठी महात्मा बसवेश्वराणी जीवनाची सुंदर संकल्पना मांडली.

सदाचार हाची स्वर्ग!अनाचार हाची नरक!

          मानवी जीवणात नको असलेल्या घडमोडीना बाजूला सारत समविचारी लोकांची चळवळ सुरू केली.या माध्यमातून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन वाढीस लागला.मग तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ लागले मग ते मंदिरावरती गरीब व कनिष्ठ प्रवर्गातील लोकांना जाण्यासाठी असलेली बंदी असो ,शूद्रावरती लादण्यात आलेले नको तेवढ्या जाचक अटी व नियमावली हे सर्वच प्रश्न घेऊन लोक समतानायक बसवेश्वराकडे येऊ लागले अशा सर्वाना त्याचा तो अधिकार मिळवून देण्यासाठी जगातील सर्वात सुंदर व वैभवशाली विचार त्याच्या पुढे मांडला.

धनिक बांधती देवालय! गरीब पामर मी काय करू?
पाय हे तुझ्या मंदिराचे खांब आहेत
डोकं हे तुझ्या मंदिराचे सुवर्ण कळस आहे
शरीर हे तुझ्या मंदिराचा गाभारा आहे आणि
गळ्यात दिलेला इष्टलिंग हा तुझा परमात्मा आहे.

        ज्याच्या देव त्याच्या गळ्यात यातून शोषणमुक्त समाजाची निर्मिती म्हणून पुरोहितशाहीला अगदी कृतीतून बाजूला सारल आणि येणाऱ्या काळात ही जीवन प्रणाली लिंगायत नावाचा धर्म म्हणून उदयास आली.सामान्य माणसाचा विचार हा सर्वात प्रभावी आणि महत्वाचा असतो हे महात्मा बसवण्णा जाणून होते म्हणून त्या सर्वांचा विचाराचा सन्मान व्हावा व समाज अंर्तमुख व्हावा म्हणून अनुभव मंडपाच्या माध्यमातून विचार विनिमय होऊ लागले त्याच सोबत सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले म्हणून ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जगातले पहिले केंद्र ठरले.यामाध्यमातून ३५० पेक्षा जाती-पोटजातीना त्यावेळी एकत्र केलं होतं तर आपण यावरून जाणू शकतो की वीसाव्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं होतं तर आजपासून नऊशे वर्षाखाली किती मोठी विषमता असेल त्यावेळी येवढं मोठं सामाजिक अद्वितीय कार्य केलं होतं.किती मोठी त्या विचारांची उंची, तो विज्ञानवादी दृष्टीकोन ,ती सामाजिक परिवर्तनाची लढाई आजही साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरते.कायक वे कैलास सिद्धांताच्या माध्यमातून कष्टकरी,कामकरी,श्रमिकांच्या मेहनतीला पहिल्यादा सन्मान पण महात्मा बसवण्णानी केला.येवढा मोठा महात्मा माझ्या भारतीय संस्कृतीत होऊनही येथील व्यवस्था या विचाराला शकडो वर्षांपासून दाबून ठेवत आहे.हा विचार एकीकडे जगमान्य झाला आहे.जग या विचारवरती नतमस्तक होतय. पण आमच्याच समाजातील काही लोक हा क्रांतीकारी विचार आजही जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण एकविसाव्या शतकात वाढलेल्या लिंगायत धर्म आंदोलनाच्या रूपाने ह्या विचाराचा मोठा उद्रेक झाला आहे.गेल्या कित्येक वर्षापासून कन्नड भाषेत बंदीस्त असलेला हा विचार महाराष्ट्रात महाराष्ट्र बसव परिषद,बसव समिती बंगळुरू च्या माध्यमातून पेरला जाऊ लागला आणि आज महाराष्ट्रसह देशात समतावादी बसव विचाराचा वणवा पेटला आहे.जगाच्या कल्याणाचा विचार आज तेवढ्याच वेगाने प्रसारित होत आहे.हीच खऱ्या अर्थाने विचाराची प्रसार करणारी त्या बहुजनांच्या नायकाची ,समतावादी महामानवाची ,महात्मा बसवण्णाची जयंती आहे.म्हणून पुनःच एकदा..

!!समस्त समाज बांधवांना महात्मा बसवण्णाच्या ९१३ व्या जयंतीच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा.!!

गुरू झाला तर बसवण्णा शिवाय गुरु नाही
लिंग झाला तरी बसवण्णा शिवाय लिंग नाही
जंगम झाला तरी बसवण्णा शिवाय जंगम नाही
प्रसाद झाला तरी बसवण्णा शिवाय प्रसाद नाही
असा उंच संघटित बसवण्णा
दीप संघटित बसवण्णा?
२१ व्या शतकाचा प्रेरणा स्रोत झालास की बसवण्णा.

शरणु शरणार्थी

Tuesday 17 April 2018

महात्मा बसवेश्वर

● महात्मा बसवेश्वर ●


(अन्य नावे: बसव,बसवण्णा, कन्नड: ಬಸವೇಶ್ವರ)
(जन्म : , इ.स. ११०५ - मृत्यू : इ.स. ११६७) 

हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.


बसवेश्वरांनी इसवी सनाच्या बाराव्या शतकात अहिंसा, सत्य, भूतदया आणि सर्वधर्मसमानता, यासारखे क्रांतिकारक विचार मांडले. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य पद्धतीला आणि त्यातून जन्मलेल्या जाती पद्धतीला त्यांनी कायम विरोध केला. "कायकवे कैलास" म्हणजे कर्म करण्यातच स्वर्ग आहे हा विचार त्यांनी मांडला. कोणतेही काम कमी प्रतीचे किंवा उच्च प्रतीचे नसते, सर्व मानव समान आहेत. कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.

कौटुंबिक पार्श्वभूमी:-

बसवण्णा शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते.त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

लोकशाही संसदेची स्थापना:-

बसवण्णांनी मंगळवेढा येथे "लोकशाही संसद म्हणजेच 'अनुभव मंटपाची' स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.

लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य:-

प्रत्येक धर्माला अधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यग्मधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणरे साहित्य असावे. खिष्रियन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे.
बसवेश्वर आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणरे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्पाचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.

याप्रकारे शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहे.

स्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा
पुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा
आमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन
महालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा
आमच्या एका वचनाच्या पारायणास
व्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम
आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास
शत रूद्रादि असे न सम
आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास
गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान.

सोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व बिचाराला शरणांचे वचनेच अधार शास्त्र होया लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

लिंगायत शब्दाचा अर्थ:-

जगविस्तार, नभोविस्तार
विस्तारातीत असे तत्व विस्तार
पाताळातीत तव श्री चरण असे!
ब्रम्हांडातीत तव श्री मुकूट असे!
अगम्य-अगोचर-अप्रतिम हे इष्टलिंग,
इवलासा झाला देऊनि माझ्या हाता,
हे कुंडल संगमनथा! (बसव बचना)

संपूर्ण विश्रात आत बाहेर व्यापलेला परमात्मा हा विराट रूपी आहे. तो अंतर्यामी ही आहे तसेच अतीतही आहे असा असलेला परमात्मा अगदी छोटासा आकार घेऊन इष्टलिंग रूपाने भक्ताच्या करकमलांत म्हण्जे डाव्या हाताच्या तळ्व्यात येतो हे इष्टलिंग विश्वरूपी महालिंगाचे छोटे रूप, अकार होय. चेतन्यमय परवस्तुपासून सचराचर सृष्टी जेथे प्रकट झाली, जैथे लीला दाखवून, ज्यांत विसर्जन पावतो त्या सत्- चित्- आनंद रूपी परमात्मास लिंगायत प्रक्रीयेत्त 'लिंग' म्हणून संबोधिले जाते. अशा या परवस्तूस विश्राचा आकार असलेल्या गोलाकारात लहान रूप देऊन शरीरावर धारण करतो तोच लिंगायत होय. लिंगायतास लिंगवंतही म्हटले जाते. धन असलेला धनवंत, गुणी असलेला गुणवंत, विधा असलेला बिधावंत, श्री असलेला श्रीमंत याप्रमाणे लिंग असलेला लिंगावंत, जो अंगवर लिंग धारण करीत नाही तो लिंगायत नव्हे लिंगायतास वीरशैव, लिंगांगि, लिंगसंगी, जंगम, सिरिजंगम आशाही नावे आहेत.
या धर्मातील मुख्य महत्वाचा नियम म्ह्णजे इष्टलिंग धारण केल्याने एक व्यक्ती लिंगायत होते जन्मामुळे नव्हे. जन्मत: लिंगायत म्हणवून घेणारा पण इष्टलिंग धारणा न करणरा व्रतहीन आसून समाजापासून बाहेर असलेला होय असे शाणांनी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणत्याही कारणमुळे लिंगाला काढून ठेवलेला आणि जन्मत: आपण लिंगायत आहोत म्हणून खोटे बोलणात्या बद्दल गुरूबसवेशांनी कठोरपणे टीका केलेली आहे.

लिंग नसता चालणार, लिंग नसता बोलणारा
लिंग नसता थुंकी गिळल्यास, केव्हाही किल्मिष्च
यास काय म्हणावे! काय म्हणावे बा!
लिंगाशिवाय चालणात्याचे अंग लौकीक स्पर्श करू नये
लिंगाशिवाय गमन केल्फ़्यास त्याचे चालणे बोलणे
व्रतहीन कूडल संगमदेव ( ब.ष.व. ६६८ )

इष्टलिंगासं आपल्या शरीरावर धारण करणे हा अति अवश्यक असा प्रथम नियम आहे. तसे धारण करणरा तोच लिंगायत होय.

लिंगायत धर्म संस्कार
लिंगायत धर्म: मुख्य तत्वे
लिंगायत धर्म चळवळ:-

लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. तो अन्य कोणत्याही धर्माची जात, उपजात, शाखा अथवा पंथ नव्हे. बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माला ज्या वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली ती सर्व वैशिष्ट्य लिंगायत धर्म पूर्ण करतो. म्हणून तो एक स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धर्मगुरु, धर्मसंहिता, धर्मचिन्ह,धर्माचे नाव,धर्मक्षेत्र, धार्मिक केंद्र, धर्मसंस्कार, धार्मिक विधी, धर्माचा ध्वज, धर्माचे ध्येय इ. लक्षणे असावी लागतात. ती लिंगायत धर्मात आहेत. म्हणून तो स्वतंत्र धर्म आहे.

धर्मगुरु:- विश्वगुरु महात्मा बसवण्णा.
धर्मसंहिता:- वचनसंहिता.
धर्मग्रंथ:- समानता पटवून देणारे वचन साहित्य.
धर्मभाषा:- लोकभाषा कन्नड.
धर्मचिन्ह:-सुष्टीकर्ता, समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग.
धर्माचे नाव:- लिंगायत
धर्मक्षेत्र:- बसवण्णांचे ऐक्य क्षेत्र कुडलसंगम, शरण भूमी बसवकल्याण, उळवी, बसवन-बागेवाडी.
धर्मसंस्कार:- इष्टलिंग दीक्षा.
धार्मिक व्रत:- शरण व्रत.
प्रार्थना केंद्र:- अनुभवमंटप.
धर्मतत्वे:- अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
धर्माचा ध्वज:- इष्टलिंग असणारे षटस्थल ध्वज.
धर्माचे ध्येय:- जात , वर्ग, वर्णरहित धर्मसहित कल्याण राज्य निर्माण करणे.
धार्मिक सण आणि उत्सव:- बसवादी शरणांचे स्मृती उत्सव
धर्मानुयायी:- शरण: कोटींच्या संख्येत आहेत.

चातुर्वर्ण्य व कर्मकांड विषयक विचार:-

वर्ण धर्माला वेडाचार ठरवतांना बसवण्णा म्हणतात,
चांभार उत्तम तो दुर्वास
कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी
तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती
जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

भस्म, गंध टिळा लावून काय उपयोग आहे, मणी गळ्यात बांधून काय उपयोग आहे जर तुमच्यात शुद्ध अंतरंग नसेल, मनाची शुद्धता नसेल हे सर्व देखावा आहे. लोक, ज्या गोष्टी आपल्या आचरणात येणे कठीण आहे त्याच गोष्टीच्या बाह्य अवडंबराने स्वतः शुद्ध मनाचे आहोत असा खोटा आव आणतात. जे देवाला दूध, लोणी, तूप अर्पण करतात ते अंधभक्त होत. त्या संदर्भात बसवण्णा म्हणतात,

दुग्ध ते उच्छिट तथा वासराचे।
पाणी ते मत्स्याचे उच्छिष्टची।
पुष्प ते उच्छिट तथा भ्रमराचे।
साधन पूजेचे काय सांगा ?

दूध हे वासराचे उष्ट असते, पाणी माशांचे उष्ट असते, पुष्प भ्रमराचे उष्ट असते असे वापरलेले अस्वच्छ उष्ट साधने देवाच्या पूजेचे साधन होऊ शकते का ? अशाप्रकारे बसवण्णांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता, बळी प्रथा, व्रतवैकल्य, उपास-तापास इत्यादींवर प्रखर हल्ला केला आहे. वीरशैव विचारधारा ही लिंगायतांना धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक गुलाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज लिंगायत विरुद्ध वीरशैव असा भेद निर्माण झाला आहे. वीरशैव हे सनातन धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. वर्णधर्म त्यांना मान्य आहे, ब्राह्मण व्रतवैकल्ये मान्य आहेत. वीरशैव विचारधारेचा प्रमुख ग्रंथ सिंद्धान्त ’शिखामणी’ हा वर्णाश्रम धर्मावर आधारित असल्याचे कारण हा ग्रंथ आगम, निगम, शैवपुराण, वेद शास्त्र इत्यादींच्या मूळ स्रोतांशी बांधलेला आहे. बसवण्णा एका वचनात म्हणतात : -
दगडाचा देव देव नव्हे।
मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे।
सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा।
देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी।
हे कुडलसंगमदेवा।।

आज परिस्थिति अशी आहे की लिंगायत धर्माचा मूळ उद्देश आणि बसवण्णांची शिकवण काय आहे हे लोकांना माहीत नाही. लिंगायत हे पूर्णपणे ब्राह्मणी वर्चस्वाखाली आहेत. लिंगायत राशीभविष्य पाहतात तेही ब्राह्मणाकडून; लग्नाचे मुहूर्त ब्राह्मणाकडून काढून घेतात; त्यांचे लग्न व अन्य धार्मिक संस्कार ब्राह्मणच करतात. लिंगायत हे बसवण्णांच्या मूळ विचारधारणेपासून दुरावला गेला आहे. त्यांचे ब्राह्मणीकरण केले गेले. लिंगायत हे कर्मकांड, देव, व्रतवैकल्य, भविष्यवाणी, यज्ञ, अंधश्रद्धा, आत्मा अशा चाकोरीत गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटते की ते ब्राह्मण आहेत. असाच प्रचार व प्रसार करून ब्राह्मणवादी लोक यशस्वी झाले आणि लिंगायतांना ब्राह्मणी धर्माच्या अधीन बनवले. संत बसवण्णांनी आयुष्यभर भटशाहीतून मुक्त करण्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना केली. त्यातून साहित्य निर्माण केले. वेद, पुराण, स्वर्ग, देव देवता, आत्मा, पुनर्जन्म, यज्ञ, वैकल्य ही थोतांडे नाकारली आणि ७७० परगड जातीतील लोकांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना केली.

बसवण्णा हे नाग लोकांचे दैवत आहे हे पटवून सांगताना अक्कामहादेवी आपल्या वचनात म्हणतात:-
देव लोकांचा देव बसवण्णा
मत्स लोकांचा देव बसवण्णा,
नाग लोकांचा देव बसवण्णा। मेदुगिरि मंदागिरीचा देव बसवण्णा।
चेन्नमल्लिकार्जुना माझा तुमचा। तव शरणांचा देव बसवण्णा


धन्यवाद.


                        ●●●●●●◆◆●●●●●●

महात्मा बसवेश्वर

महात्मा बसवेश्वर.

फोटो:-











व्हिडिओ:-







महात्मा बसवेश्वर


महात्मा बसवेश्वर : एक आद्य समाज सुधारक


महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते. समाजसुधारकांच्या यादीतही यांचे पहिले स्थान आहे. म्हणूनच त्यांना आद्य भारतीय समाजसुधारक, क्रांतीयोगी व युगपुरुष मानले जाते.

शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ साली प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते.  त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते. त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या. बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज व बहिणीचे नाव नागम्मा होते. बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते. तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला. त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला. तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले. तेथे ते एकतीस वर्षे राहिले.

बसवेश्वरांनी बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली. पुढे त्यांची राजाचा कोषाधिकारी म्हणून निवड झाली. त्यावेळी मंगळवेढा परगणा बिज्जल राजांच्या अधिपत्याखाली होता. त्या राजवटीत मंगळवेढा ही राजधानी होती. बसवेश्वर हे वेदशास्त्रात, धनुर्विद्येत व इतर कलांत पारंगत असल्याने आणि ते हुशार व चाणाक्ष असल्याने राज्याचे प्रधान झाले. त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली. रेवणसिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी एकाच शिवपिंडीवर स्थापन केल्या. पुढे, बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली व ते धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशांत आले. तेथे त्यांचा लिंगायात धर्म बऱ्यापैकी रुजला. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ  = बैल) या नावावरून ते सूचित होते.

बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. त्या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ॐ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली 'शिवानुभवमंटप' म्हणजेच 'अनुभवमंटप' ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण तेथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्र्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही; परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. तेथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. बसवेश्र्वरांनी तेथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

बसवेश्र्वरांना पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले. उदाहरणार्थ, त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. बसवेश्वरांनी स्त्रियांना लिंग दीक्षेचा पुरुषाप्रमाणेच अधिकार दिला. त्यामुळे स्त्रियांना धार्मीक स्वातंत्र्य बहाल झाले. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.

त्यांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले. तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते. यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा  करणारा ‘कायकवे  कैलास’ हा  बसवेश्र्वरांनी  मांडलेला  महान  सिद्धांत  आहे.  कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवली.

महात्मा बसवेश्वरांचा लिंगायत धर्म प्रामुख्याने दलित संवेदनेवर आणि मानव जातीच्या तत्वावर आधारलेला आहे. आजही या धर्मात विविध जातींचा समावेश आहे. समता हे तत्व त्यांच्या धर्म प्रसाराचे प्रमुख सूत्र आहे. बसवेश्वरांनी हा बंधुभाव धर्मात कायम ठेवला. 'आपण जे कमवतो त्यात ईश्वरांचा वाटा आहे. म्हणून त्यातील दीन दु:खीच्या जीवन कल्याणासाठी दानधर्म केला पाहिजे.' यावर त्यांनी भर दिला होता. त्यांनी जन्माने ब्राम्हणत्व नाकारुन त्यांनी लिंगायत धर्माला नवसंजिवनी प्रदान केली. त्यांना त्यांचे जीवितकार्य पूर्ण झाले असल्याची भावना निर्माण झाल्यावर, ज्या कुंडलसंगमामुळे आपण ईश्वरी इच्छाशक्तीचे साधन बनलो त्या कुंडलसंगमाकडे गेले पाहिजे, असे त्यांना वाटले. इ.स. 1167 मध्ये वयाच्या 66 व्या वर्षी ते संगमेश्वराशी एकरुप झाले. कर्नाटक सरकारने कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वरांचे समाधीस्थळ उभारले आहे.



(प्रमोद शेंडे यांचा लेख)
                                ●●●◆◆●●●

Monday 16 April 2018

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
ह्या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम यंती, बसवेश्वरजयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
महत्त्व
  • या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.
  • नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.
  • परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
  • वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
  • जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
  • कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते'.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
सांस्कृतिक महत्त्व
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

आख्यायिका:-
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी दुसर्‍या युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणारया काळाला ‘महायुग' असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचाकाळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी' ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते. त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.

या दिवशी करायच्या गोष्टी:-
  • या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
  • सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
  • ब्राह्मण भोजन घालावे.
  • या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
  • या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.



                    ●●●●●◆◆●●●●●

लिंगायत धर्म

लिंगायत धर्म

लिंगायत हा १२व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेला एक स्वतंत्र अवैदिक धर्म आहे, लिंगायत हिंदू नाहीत, ते वीरशैव नाहीत. फक्त इष्टलिंग पूजा करतात. वेद मानत नाहीत. त्यांचा पंचसुतक आणि पुनर्जन्म या कल्पनावर विश्वास नाही. त्यांच्यांत जातिभेद नाहीत. (लिंगायतांमधील काही जातींची नावे या लेखाच्या शेवटी दिली आहेत.!!!)

लिंगायत धर्म हा भारतातील तिसरा मोठा धर्म आहे. या धर्माचे अधिकतम लोक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूत या धर्माचे बरेच लोक आहेत. हा एकेश्वरवादी धर्म आहे. लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.! लिंगायत हा एक धर्म असून ती जात नव्हे. जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग, वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म. या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. लिंगायत धर्मात जन्मामुळे कोणीही उच्च, नीच असे न मानता ’विटाळाविण पिंडास न च आश्रय’ असे सांगून असा बोध दिला आहे.

गोत्रनाम पुसता गप्प का बसता?
शिर खाजवित भूमी का गिरवता?
गोत्र मादार चेन्नय्या, गोत्र डोहार कक्कय्या,
ऐसे सांगा ना हो, कूडलसंगय्या

लिंगायत धर्मगुरु गुरु बसवा:-

एक विशिष्ट असा सिद्धांत, साधना आणि धर्मगुरु एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिध्दंतापर्यत त्यात वाव आहे. सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत.

स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंक्ण बांधून
निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून
कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण
संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२)

महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८)

"प्राणलिंगाचा, भ्गवेवस्त्र घालण्यचा, प्र्सादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्या करताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७)

म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरु बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.

लिंगायत धर्मगुरु गुरु बसव
बसवेश्वर आदिगुरू कसे?
लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीIत धर्म आहे.

न जाणणात्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे.

धर्मगुरु: विश्वगुरु बसवण्ण (११३४-११९६)

धर्म संहिता (धर्मग्रंथ): वचन साहित्य

धर्म भाषा: कन्नड

धर्माचे देव नाव: लिंगदेव

धर्म चिन्ह: जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’

धर्म संस्कार: लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षे

धर्म सिद्धांत: शून्य सिद्धांत

साधना: त्राटक योग (लिंगांगयोग)

दर्शन: षटस्थल दर्शन

समाजशास्त्र: शिवाचार-(सामाजिक समानना)

नीति शास्त्र: गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक)

अर्थ शास्त्र: सदाचार (कायक- दासोह-प्रसाद)

संस्कृति: अवैदिक शरण संस्कृति

परंपरा: धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage).

धर्म क्षेत्र: गुरु बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण

धर्म ध्वज: षट्कोन - इष्टलिंग सहित केशर रंगवणे बसव ध्वज

धर्माचे ध्येय: जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण)

इष्टलिंग:-
लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे.

लिंगायत धर्माचे वैशिष्ट्य:
१. लिंगायत हा कायकावर उदरनिर्वाह करणारा कायकनिष्ठ धर्म आहे.
२. लिंगायत हे श्रमालाच ईश्वर मानतात, घाम येऊ पर्यत कष्ट करत राहणे हीच ईश्वराची पूजा आहे , असे लिंगायत मानतात. ३. स्वेदस्नान हेच लिंगायतांचे तिर्थस्नान आहे. त्यांना तीर्थयात्रा, तीर्थाटन, तिर्थस्नान करण्यासाठी भटकण्याची गरज नाही.
४. लिंगायत घर, संसार, पत्नी,गाव, नातेवाईक सोडून दूर जंगलात जाऊन राहण्याचा, वैराग्य स्वीकारण्याचा, संन्यास ग्रहण करण्याचा निषेध करतात. लिंगायत एकांतवादी नाही, लोकांतवादी आहेत.
५. सतीपतीने एकत्र राहून एकमेकांच्या शारीरिक लैंगिक गरजा भागवून, दोघांनी एकत्र राहून कायक करायला शिकविणारा लिंगायत धर्म आहे.



धन्यवाद.


                         ●●●●●◆◆●●●●●


Tuesday 10 April 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


बाबासाहेब अांबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर
(१४ एप्रिल १८९१—६ डिसेंबर १९५६).
आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी व बहुआयामी विद्वान.

●●●●●●●●●●●●●●

 एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. रत्‍नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई मरण पावली. आंबेडकरांचे पुढील सर्व पालनपोषण रामजी व त्यांची बहीण मीराबाई ह्यांनी केले. रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले.

आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. या काळात दोन महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे त्यांचे रमाबाई ह्या स्वजातीय, म्हणजे महार जातीच्या, मुलीशी लग्न झाले व दुसरी त्यांचे जीवन प्रभावी होण्यास साह्यभूत झालेल्या केळुसकर गुरूंजीशी त्यांचा निकटचा संबंध आला. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या मिळविल्या.

भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी धरली. बडोदे येथील वास्तव्यात त्यांना अस्पृश्य म्हणून जे अत्यंत कटू अनुभव आले, त्यांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईस येऊन सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पतकरली. तोपर्यंत अस्पृश्य म्हणून पदोपदी त्यांची जी मानखंडना झाली, तिचा परिणाम त्यांच्या मनावर फार झाला.

अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरूवात केली; मुंबई येथे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक काढले, कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची त्याच संस्थानातील माणगाव येथे त्याच वर्षी परिषद घेतली व स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहभोजनांचे कार्यक्रम घडवून आणले.

नागपूर येथे मे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत. या महर्षी शिंद्यांच्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ च्या धोरणाचा या परिषदेत निषेध करण्यात आला. त्यांनी हाती घेतलेल्या ह्या प्राथमिक कार्यातच त्यांचे नेतृत्वाचे गुण दिसून आले.

हे लोकजागृतीचे कार्य चालू असताना, स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याकरिता, ते मुख्यतः आपले स्नेही नवल भंथेना आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी . ही दुर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. सरकारी विधि-महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे व प्राचार्याचेही काम केले. तथापि अस्पृश्यांच्या हिताचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.

शिकवा चेतवा व संघटित करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२६ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सुरुवात केली.

१९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृति जाळली. त्यांच्या काही अनुयायांसह त्यांच्यावर सनातन्यांनी खटला भरला. खटला जिद्दीने लढवून त्यांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका करून घेऊन चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित केला.

१९२८ साली भारतात आलेल्या सायमन आयोगावर इतरांनी बहिष्कार घातला होता. पण अस्पृश्य बंधूचे हित लक्षात घेऊन आंबेडकरांनी मात्र त्या मंडळासमोर आपली साक्ष नोंदवून, अस्पृश्य लोकांकरिता सरकारने काय करावयास पाहिजे, हे सांगितले. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह १९३० साली नासिक येथे काळराममंदिर-प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यात त्यांना व त्यांच्या अनुयायांना मार खावा लागला, पण पूर्वीच्याच जिद्दीने त्यांचे कार्य चालू राहिले. त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, समता, इ.वर्तमानपत्रांद्वारे त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी व इतर संस्थाद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला.

आंबेडकर १९३० मध्ये  गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तिन्ही परिषदांना ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू मांडली आणि अस्पृश्यांच्या इतर हक्काबरोबर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व ती पंतप्रधान मॅक्डॉनल्ड ह्यांनी मंजूरही केली. त्यातूनच गांधी व आंबेडकर ह्यांच्यात मतभेद निर्माण झाले.

गांधीना हा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी पुणे येथे येरवड्याच्या तुरूंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्या वेळी गांधी व आंबेडकर ह्या दोघांत राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयी चर्चा होऊन २४ सप्टेंबर १९३२ रोजी सुप्रसिध्द  पुणे करार झाला. त्यान्वये पाच वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावा, असे ठरले. या घटनेनंतर तीन वर्षानी त्यांची पत्नी रमाबाई मरण पावली.

त्यांनी स्वतंत्र मजूरपक्षाची स्थापना केली (१९३६). ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९३९ साली येऊ घातलेल्या संघराज्य पध्दतीला त्यांनी विरोध केला व दारुबंदीच्या धोरणावर टीका केली, १९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन’ नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला.

या पक्षातर्फे अस्पृश्यांकरिता त्यांनी अनेक लढे दिले. १९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली व मुंबईस सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले. ह्याच संस्थेने पुढे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापिले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री म्हणून आले. स्वतंत्र भारताच्या संविधानसमितीचे ते सभासद झाले.

पुढे ते संविधान-लेखन-समितीचे अध्यक्षही झाले. अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील ११ वा अनुच्छेद हा आंबेडकरांचा विजयच आहे. सतत परिश्रम घेऊन, चर्चा करून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सु. तीन वर्षांत संविधानाचा मसुदा तयार केला. ह्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी ‘हिंदु कोड बिल’ लोकसभेला सादर करण्याचा बहुमान मिळविला.

डॉ. शारदा कबीर ह्या सारस्वत महिलेशी १५ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी दुसरा विवाह केला. ह्या सुमारास त्यांचे नेहरूंशी व काँग्रेस धोरणाशी फारसे पटेना. म्हणून मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला.हिंदुधर्म जातिसंस्थेमुळे पोखरला गेला आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. स्पृश्यांकडून अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय धर्मांतरावाचून दूर होणार नाही, या त्यांच्या दृढ श्रध्देनुसार त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभाने अनेक अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी बौध्द धर्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. त्यांच्या मनात ‘रिपब्लिकन पक्ष’ स्थापन करावयाचा होता, परंतु तो त्यांच्या हयातीत स्थापन झाला नाही.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर