🔝◼◼◼
🔘 Deva Tuze Kiti Sundar Aakash
🔘 देवा तुझे किती सुंदर आकाश
👇🏻✨💫
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर 'असशील'
➖ श्रीकांत हळळे,निलंगा/उदगीर
🙏🏻🔚
No comments:
Post a Comment