भोगी
पौष महिन्यात , हिंदूंच्या 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात.
भोगी देणे - भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
मकरसंक्रांत
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक 'संक्रांत' हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात. सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.
संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.
सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व 'तिळगुळ घ्या - गोड बोला' असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे 'बोरनहाण' केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात.
या सणानिमित्त शुभेच्छापत्रे पाठविण्याचीही पध्दत आहे.
१४ जानेवारीशी मकर संक्रातीचा संबंध नाही
महाशिवरात्री (माघ वद्य चतुर्दशी)
महाशिवरात्रीला शंकराची पूजा करुन रुद्राभिषेक व उपवास करतात. या दिवशी बेलाच्या पानाला विशेष महत्त्व असते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीची जत्राही भरते. एकेका हिंदू देवतांची स्वत:च्या आवडीची फळे-फुले कोणती ते ठरलेले आहे. शंकराला बेलाचे त्रिदल आणि धोत्र्याचे फूल प्रिय आहे.
महाशिवरात्रीविषयी एक कहाणी प्रसिध्द आहे. फार पूर्वी एक शिकारी शिकार करण्याकरितां अरण्यात गेला होता. तो झाडावर दबा धरुन बसला. ते झाड बेलाचे होते. परंतु शिकार करण्याच्या दृष्टीने झाडाच्या फांद्या आड येऊ लागल्या. म्हणून त्याने बेलाची पाने तोडण्यास सुरवात केली. त्या झाडाखाली शंकराची एक पिंड होती. त्या पिंडीवर आपोआप बेल पडू लागला. इतक्या अवधीत पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. त्या शिका-याने तिच्यावर नेम धरला. याची हरिणीला चाहूल लागली. तेव्हा तिने शिका-याला सांगितले की माझी लहान बाळे घरी आहेत. त्यांना मी भेटून सूर्योदयापूर्वी पुन्हा इकडे येते. मग माझी शिकार कर. शिका-याने तिचे म्हणणे कबूल केले. हरिणी परत येण्याची तो वाट पाहू लागला. रात्रभर झाडावर राहिल्याने त्याला आपोआपच उपवास घडला. शिका-याला सांगितल्याप्रमाणे हरिणी तेथे हजर झाली.
तिचा प्रामाणिकपणा पाहून शिका-याचे अंतःकरण द्रवले. त्याला तिची दया आली व तिला मारायचे नाही असे त्याने ठरवले. या सर्व गोष्टीमुळे शंकर शिका-यावर प्रसन्न झाले. आणि त्यांनी शिका-याला व हरिणीला विमानांत बसवून उध्दरून नेले. म्हणून जे लोक महाशिवरात्रीचे व्रत करतील ते सदैव सुखी रहातील असे म्हंटले जाते.
या दिवशी सर्वांनी उपवास करण्याची पध्दत आहे. सकाळी स्नान वगैरे करून शंकराला जाऊन बेलाची पाने व कवठ हे फळ शंकराला वाहिले जाते. आंब्याला या सुमारास मोहोर येतो. महाशिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहण्याचीही प्रथा आहे. हाताने तयार केलेल्या कापसाच्या दो-याच्या ७५० वाती करून शंकराच्या देवळात किंवा घरातील देवापुढे या वाती तुपांत भिजवून लावल्या जातात. उत्तर भारतात या दिवशी खसखस व थंडाई घालून भांग पिण्याची पध्दत आहे. घरोघरी साबुदाणा खिचडी, रताळी, बटाटे यांपासून केलेले जिन्नस वगैरे खाण्याची प्रथा आहे.
गुढीपाडवा
हिंदू वर्षांतील पहिला दिवस गुढी पाडव्यापासून सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. पुराणात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात.
पुराणात या दिवसाचे महत्व अनेक पद्धतीने सांगितले जाते,
- ब्रम्ह देवाने या दिवशी विश्व निर्माण केले, असे मानले जाते.
- रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता.
- शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.
होळी
पुराणकाळी भक्त प्रल्हादाच्या विनाशासाठी त्याच्याच अविचारी पित्याने, हिरण्यकशपूने त्याच्या बहिणीला, होलिकेला दिव्य अग्निरोधक शाल पांघरुन प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. पण ऐन वेळी शाल वार्याने उडाली आणि प्रल्हादावर येऊन पडली. होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हादाचे नारायणने रक्षण केले. नंतर नारायणनेच
च
च
हिरण्यकशपूचा नृसिंह अवतार धारण करुन वध केला. या अहंकाराच्या आणि द्वेषाच्या दहनाचे प्रतीक म्हणून होळी (होली, होलिकोत्सव) साजरी केली जाते.आपण साजर्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आपले मन स्वच्छ व्हावे आणि स्नेहाचे एक नवे पर्व आपण दुसर्या दिवसापासून सुरु करावे. घरात भरभरुन आलेल्या धान्यातूनच नैवेद्य होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जाते. निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला हा आदर्श.
आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता, आंब्याला लगडलेल्या बाळकैर्या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस आले आहेत असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.
अक्षय तृतीया
हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्ययोनीत जन्माला येणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करुन घेण्याची तीएक मोठी संधी असते. मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तर्हेने उपयोग करुन घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्याच त्या फेऱ्यात फिरत राहतो. अक्षयतृतीस या दिवसाचे महत्त्व असे आहेकी या दिवशी भूकेल्याला अन्न, तहानेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र याप्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते. अशी समजूत आहे. मात्र अक्षयतृतीयेचा अर्थ ह्याहून व्यापक आहे. हा दिवा खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आग, तेज, वायु व आकाश या पंचमाहाभुतांविषयी. कारण त्यांच्या साह्यानिच मनुष्य देहाला चैतन्य प्राप्त होते. आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्या मनुष्य देहाचं दान मिळालेल आहे. म्हणूनच अक्षयतृतीयाच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान, करण्यात येते.
वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षयतृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भूत असते. चित्राचे बोट आलेला वसंतऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो.
वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली, म्हणूनही हा अतिशय शुभदिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत महुर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, योग्य मुहूर्तावर सुरु केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळत असे मानतात. अक्षय्य याचा अर्थ कधीही क्षय न होणारा, नाश न पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. अक्षयतृतीयाच्या दिवशी अगदी गुंजभर वा १ ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते म्हणून अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते.
धार्मिक रीतीवाजांनुसार अक्षय्यतृतीयाच्या दिवशी आपले दिवगंत आई-वडील, आजी-आजोबा वा आप्त स्वकीय जलदान-अन्नदानवाटपा निमित्ताने गावातील, शहरातील अनाथालये, वृद्धाश्रम, शिक्षणलय, रुग्णसेवा संस्था, यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षयतृतीयाचा सण साजरा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो.
संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र-वैशाख या दोन महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते. परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एकाच दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस आहे अक्षय्य तृतीयेचा. अक्षयतृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. तरी विदर्भात या दिवसाला दिवाळी सणासारखे महत्त्व आहे. गरिबतला गरीब माणुसही आपल्यापरीने नांगरणीला सुरवात करतात. नांगराची पूजा करून शेतीच्या कामाला सुरवात करण्यात येते. कृषीक्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय्य तृतीया हा अक्षय्य – उंदड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.
रामनवमी
राम… राम म्हणजे स्वतःआनंदात रममाण असलेला आणिदुसऱ्यांना आनंदात रममाणकरणारा. 'श्री' हे भगवंताच्याषड्गुणांपैकी एक आहे. असा अयोध्येचा राजा श्रीराम हा दशरथव त्याची प्रथम पत्नी कौसल्यायांचा पुत्र होता. चैत्र शुक्लनवमीला, दुपारी बारा वाजताकडक उन्हाच्या प्रहारात श्रीरामाचा जन्म झाला होता. भारतीयसंस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. राम आणि कृष्णभारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदूआहेत.
लोक राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. कारण, त्यांचाजन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष 'उत्तम' कसाहोऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला 'मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या' जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनआपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यातत्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम' असेम्हटले जाते.
राम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाला तीन भाऊहोते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबातदुसर्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथेकधीही भांडणे होत नाहीत. रामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरचअनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनीआनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगलेनाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. राम वडिलांची एकही आज्ञा टाळतनसत. ते नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्यालावनवासाला जावे लागले. तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवताराम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्वदर्शवतो.
राम आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठीराम सुग्रीवाला तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीवरामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे खूप प्रेम होते. त्याला थोडेहीदु:ख झाले तरी रामाच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तररामासारखा आणि शत्रूही असावा तर रामासारखा असे लोक म्हणतअसत. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्नी संस्कार करण्यास नकारदिला होता. 'मृत्यूबरोबर वैर संपत असते. म्हणून आपल्या भावालाअग्नीसंस्कार दे'. 'तू जर हे काम करत नसेल तर मी करतो. रावण जसातुझा भाऊ होता तसा माझाही होता.' असे तेव्हा रामाने बिभीषणालासांगितले होते.
रामासारखा पती मिळावा, अशी प्रत्येक स्त्री कामना करत असते. रामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पतीमिळावा म्हणून कामना करत होती. त्या दृष्टीकोनातून रामाचा सीतात्याग आत्म बलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामालाआपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतरकिष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्यरामाने बिभीषणाला दिले होते. परंतु, रामाला या राज्याचा मोह झालानाही.
मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा, त्यासाठी महर्षी वाल्मीकी यांनी राम चरित्र लिहले. 'सदगुणांचा सर्वोच्चबिंदू म्हणजे राम!' हे सर्व गुण स्वत: अंगीकारून प्रत्येकाने रामबनण्याची महत्त्वकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊनसर्वजण धन्य होतात. कारण, राम देव संस्कृतीचे संरक्षक होते. राक्षसीसंस्कृतीचा नाश करणार्यांना भारतीय जनता डोक्यावर घेऊन नाचते. सामान्य जनतेनेही रामाला आपल्या ह्रदयात चिरंतन स्थान दिले आहे. ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे.
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकारयांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.
गुरुपौर्णिमा
आपल्या भारतीय संस्कृतीमध्येदेव-देवता ह्यांना जितके महत्त्वआहे, त्यापेक्षा थोडे अधिक महत्वआहे ते गुरूला. गुरू आणि सद्गुरूयांना मानवी जीवनातल्या जडणघडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्याच्यामुळे आपल्या प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते त्यासद्गुरुंचे महत्त्व ते काय सांगावे !
वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढातयेणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेलागुरुपौर्णिमा म्हणतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्तकरण्याचा हा दिवस.
नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालाबोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेयजीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माच कारण काय, प्राप्तनरजन्माची खरी सार्थकता मिळेल ह्याच मार्गदर्शन करणारे सद्गुरू.
अशा अनेक व्यक्तीमत्वांमधून ते गुरूतत्त्व आपण अनुभवत असतो.
खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे. जो शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरणकरणे. सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे. त्यांचा शब्द चालवणे म्हणजे गुरू पूजन.
आपल्या भारतीय संस्कृती मध्ये गुरू-शिष्याच्या नात्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत. तसेच सद्शिष्यही आहे. ह्या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत.
गुरूशिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत. उदा : व्यासआणि गणेश, वशिष्ठ आणि राम, कृष्ण आणि सांदिपनी, मच्छिंद्रनाथआणि गोरक्षनाथ निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ.
सद्गुरू सारीखा असता पाठीराखा ।
इतरांची लेखा कोण करी ॥
असे खरे नमन करणाऱ्या विद्यार्थी, शिष्य, साधक, उपासक, अभ्यासकह्यांच्यावर गुरू आशिषामधून गुरूतत्त्व कृपावर्षाव करत असते. त्याकृपाबळावरच शिष्य मोठे कार्य करू शकतो. ह्याचे उदा. म्हणजेनिवृत्तीनाथ ह्यांच्या गुरूकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरीलेखनाच कार्य.
हिंदु धर्मांत महर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशीव्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याचदिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. त्यामुळेच कांही जणह्या गुरूपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं ही म्हणतात. महर्षी व्यासयांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवसगुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीतअर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्याध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थखूपच व्यापक आहे.
॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु: साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥
या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाटदाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्या शिवरायांनीरामदासस्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणादेण्याची प्रथा आहे.
ह्या दिवशी शाळेमध्ये पण विद्यार्थी आपल्या शिक्षक शिक्षिकांना फुलंदेतात. एखादी भेटवस्तू देतात. अशा वस्तू देणे. नारळ हार पेढे शालगुरूंना देणे ह्या जरी बाह्य खुणा असल्या तरी खरी खूण म्हणजे शिष्यानंगुरूंना केलेत नमन, त्यांच्या पदी घेतलेली अनन्य भावाची शरणांगती!
गुरूवंदनांत गुरू नमनांत शरणांगत भाव हवा कृतज्ञता हवी.
प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवानबुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवानबुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवूनआपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु नमिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात.
राक्षबंधन
नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात.
कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात
तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले..
भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतांत साजरा केला जातो. हा राजस्थानचा प्रमुख सण आहे या पौर्णिमेला 'पोवती पौर्णिमा' असेही म्हणतात.
कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.
रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात
तसेच ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले..
भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व, स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.
No comments:
Post a Comment