● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस- 11 मे


आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस’. आजच्या दिवशी भारताने पहिली अणुचाचणी केली. त्यानिमित्ताने हा दिवस साजरा केला जातो. तंत्रज्ञान म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे केल्याने मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. पण हा दिवस आजच्या दिवशी का साजरा
करतात?? या बद्दल आपण थोडी माहिती बघणार आहोत.

११ मे १९९८ रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डाॅॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती- १ या आण्विक क्षेपणास्त्रााची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेच, पोखरण-२/आॅपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. पूर्वी पोखरण- १ हे १९७४ साली ‘स्माईलिंग बुद्ध’ क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उडवण्यात आले होते. या चाच्ण्यामुळे भारत राष्ट्रांच्या ‘न्यूक्लियर क्लब’ मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नाॅन- प्रोलीफरेशन आॅफ न्युक्लिअर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला.

याशिवाय, याच काळात देशातच विकसित पहिले स्वदेशी विमान हंस- ३ ने त्याचे पहिले उड्डाण बेंगळूरू येथे घेतले. हे विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद च्या विमान नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज ने विकसित केले होते. तसेच ११ मे १९९८ रोजी संरक्षण संशोधन विकास संघटना कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्रााची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली, जे नंतर भारतीय लष्कर आणि वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाईडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.

देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन माजी पंत्रप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. भारतात १९९९ सालीपासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

            ----------------//---------------

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर