● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

ए.पी.जे.अब्दुल कलाम




मिसाईल मॅन


ए.पी.जे. अब्दुल कलाम
(भारतातील शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती)

पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
वडील : जैनुलाबदिन अब्दुल
जन्म : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर 
मृत्यू२७ जुलै, इ.स. २०१५, शिलाँग
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम

पुरस्कार : पद्मभूषण’,
‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न'

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

शिक्षण :
त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

कार्य :
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

गौरव :
भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

निधन :

डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 
शिलाँग इथं सोमवारी संध्याकाळी डॉ. कलाम यांचं निधन झालं. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्य आदर्श आहे.

                            ----//----

 डॉ. एपीजे अब्दुल कलाम ज्यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. ते कायम आपल्या स्मरणात देशाला दिशा दाखवणारे राष्ट्रपती म्हणून राहतील. 

शिलाँग इथं सोमवारी संध्याकाळी डॉ. कलाम यांचं निधन झालं. तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करत होते. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्य आदर्श आहे. 

त्यांच्याबद्दल सामान्यपणे माहिती नसलेल्या या 10 गोष्टी जाणून घ्या...

1. देशाचे राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉ. कलाम हे एका खोलीच्या फ्लॅटमध्ये राहत होते आणि देशाच्या आघाडीच्या संरक्षण तंत्रज्ञानासाठी नव्या शोधाचं काम करत होते. 

2. डॉ. कलाम यांच्या लहानपणी त्यांचे सर्वात जवळचे तीन मित्र होते. रामानंद शास्त्री, अरविंदम आणि शिवप्रकसन... हे तिन्ही जण हिंदू ब्राह्मण कुटुंबातील होते. 

3. रामेश्वरम मंदिरातील प्रमुख लक्ष्मण शास्त्री हे डॉ. कलाम यांच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. 

4. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एमएस सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल खूप आदर होता. कर्नाटक संगीत त्यांना खूप आवडायचं. सुब्बलक्ष्मी स्वत: आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पद्धतीनं म्हणजे खाली जमिनीवर बसून केळीच्या पानात जेवायचे. 

5. डॉ. कलाम यांना दाक्षिणात्य पदार्थ विशेष करून इडली खूप आवडायची. 

6. जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं. 

7. एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते. 

8. एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता. 

9. एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली. 

10. राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.

--//--

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर