● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Thursday, 29 August 2019

'कणा' - कवी कुसुमाग्रज यांची कविता


https://youtu.be/zwClruoMFu4
Watch This Video
🙏🏻👆🏻👇🏻

भीषण महापूर हाणीमुळे झालेल्या अन्यायग्रस्त पूरग्रस्तांना ही कुसुमाग्रजांची 'कणा' कविता समर्पित
➖श्रीकांत हळळे,निलंगा/उदगीर➖

➖➖➖➖➖➖➖➖➖
  ◼ कणा - कुसुमाग्रज
➖➖➖➖➖➖➖➖➖

‘ओळखलत का सर मला?’
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून 
‘गंगामाई पाहुणी आली,
गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती
पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर
आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे,
चिखलगाळ काढतो आहे,

खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन,
फक्‍त लढ म्हणा’!

👏🏻👏🏻◼◼◼◼◼👏🏻👏🏻

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर