दुसरे जागतिक महायुद्ध ; इतिहासातील सर्वांत मोठी जीवित हानी
1 सप्टेंबर सन -1939 ते 1945 दरम्यान दुसरे जागतिक महायुद्ध झाले होते.
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्मनी, इटली, आणि जपान ह्यांचा समावेश होता.
नाझी जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 ला पोलंडवर हल्ला केला. त्याच बरोबर फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारलं. या युद्धात इटली व जपान जर्मनीच्या मदतीसाठी युद्धात उतरले. जर्मनीने 1941 साली सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेवर हल्ला चढवला. सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंतचं अंतर जवळपास 8000 किलोमीटर आहे. त्यामुळे संपूर्ण रशिया जर्मनीच्या ताब्यात येणं जवळपास अशक्य होतं.
त्यात पूर्व सीमेवर प्रचंड थंडी असल्यामुळे इंधन गोठू लागलं आणि जर्मनीचं सैन्य अडकून पडलं. जर्मनी ज्या तेलाच्या विहीरींमधून इंधनाची सोय करणार होतं ते रशियाने उधळून लावलं.
हे सगळं होईपर्यंत अमेरिका या महायुद्धापासून अलिप्त होती. पण डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अक्ष राष्ट्रांनीही अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारलं. पण 1942 साली जपानचा Battle of Midway त पराभव झाला.
त्यानंतर जर्मनी आणि इटली ह्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली. 1944 साली फ्रांस च्या नॉर्मनडीच्या किनाऱ्यावरून दोस्त राष्ट्रांनी प्रति लढाई सुरू केली. 1945 साली सोव्हिएत युनियनने बर्लिनवर ताबा मिळवला, ॲडॉल्फ हिटलर ने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.
युरोपातलं महायुद्ध संपलं. पण जपान आणि अमेरिकेतली लढाई अजून सुरूच होती. 7 डिसेंबर, 1939 साली जपानने पर्ल हार्बर वर जिथे अमेरिकेचा तळ होता तिथे हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने 1945 ला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला. जपानने बिनशर्त शरणागती पत्करली आणि अखेर दुसरं महायुद्ध संपलं.
▪ दुसरं महायुद्ध संपलं आणि त्याच बरोबर अणू युगाची सुरुवात झाली.
▪ दुसऱ्या महायुद्धात जवळपास 70 देशांचे सैन्य सहभागी झाले होते.
▪ या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली होती.
▪ मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे.
▪ या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
---//---

No comments:
Post a Comment