● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Thursday, 29 August 2019

29 ऑगस्ट ध्यानचंद यांचा जयंती दिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’

■ भारतीय हॉकी संघाचा जादुई खेळाडू ध्यानचंद
■ ध्यानचंद यांचा जयंती दिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ 

राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस भारतात  साजरा केला जातो. १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू ध्यानचंद सिंग यांचा हा जन्म दिवस.  ध्यानचंद यांचा जन्मदिवस  भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी इलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील समेश्वर सिंग हे ब्रिटिश भारतीय सेनेत होते. ध्यानचंद यांनी त्यांच्या १९२६ ते १९४८ सालापर्यंतच्या क्रीडा कारकिर्दीत ४०० हून अधिक गोल्स केले. लहान वयात ध्यानचंद यांना खेळाबद्दल विशेष आकर्षण नव्हते मात्र त्यांना कुस्ती आवडत असे. पुढे रांची येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांना खेळाबद्दल रस निर्माण होऊ लागला. वयाच्या १६व्या वर्षी ते भारतीय लष्करात भरती झाले.

१९३६ साली ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीच्या हॉकी संघाला पराभूत केले. त्यानंतर हिटलरने ध्यानचंद यांची सर्वोत्तम कामगिरी पाहून त्यांना जर्मनीच्या लष्करात येण्याची विचारणा केली होती. परंतु ध्यानचंद यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. ध्यानचंद यांच्या कारकिर्दीतील सुवर्णपदकाचा कमाईनंतर भारत हॉकीमध्ये प्रभावशाली संघ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५६मध्ये भारत सरकारने ध्यानचंद यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जाणारा पद्मभूषण प्रदान केला.

आंतरराष्ट्रीय हॉकीच्या मैदानावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून त्यांनी आपल्या देशालादेखील गौरवाचा शिखरावर पोहोचवले. राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर त्यांनी आपल्या कामाचा सुवर्ण ठसा उमटवला. ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मनाचा मानला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती भवनात देशाचे राष्ट्रपती देशातील सर्वोत्तम खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करतात.

                           -----//----

हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो.

मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. विशेषत: बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चार्ली होती. या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली होती.मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण 'गोल मशीन' मशीन असल्याचे सिद्ध केले होते.

                           -----//-----

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर