आपल्याला बडबड गीतांचे Lyrics हवी आहेत?
नक्कीच ही site तुम्हाला मदत करेल.
फक्त आपल्यासाठी...
खालील site वर गीतांचे 5 pages आहेत.
खालील site वर गीतांचे 5 pages आहेत.
Click here बडबडगीत
१)एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले साबणाचे फुगे - 2
छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे - 2
एक फुगा अहा एक फुगा - 2
एक फुगा बाबाच्या चष्म्यावर बसला
गंम्पूला तो डोळाच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले ......
एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंम्पूला तो लाडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला
गंम्पूला तो चेंडूच वाटला
एक फुगा अहा एक फुगा
गंम्पू ने आणले .....
२)शाळेच्या दारात कोण ग उभी
शाळेत येते मी गुरुजी
गुरुजी छडी नका मारुजी
लागतंय हातावर
औंदाच ग वरीस बाई मी सहाव गाठलं ग
शिक्षण घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकील ग
रडू येतंय मला वरचे वरी
आईची आठवण हैराण करी
गुरुजी छडी नका
शब्द वाचता वाचता माझी मॅन दुखू लागली ग
अंक लिहता लिहता माझी बोट दुखू लागली ग
उलटे अक्षर काढले जरी
आरसा त्याला उलटे करी
गुरुजी छडी नका मारुजी