● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Saturday, 23 December 2017

जन्मापासूनचे अनुभव हेही एक शिक्षणच..!

शालेय अभ्यासक्रम तयार करणारी माणसे सूज्ञ असतात. अभ्यासक्रमाला पोषक अशी पुस्तके बनाणाऱ्या मंडळातील सभासदांचा लहान मुलांशी किती संबंध येतो याचाही विचार करायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षकाने फार मोठ्या जबाबदारीने काम केले पाहिजे.



 पालकांनी अभ्यास करून घेणे याबरोब्रच मुलांचे समाधान कायम ठेवणे, त्यांच्या आनंदात कमतरता होऊ न देणे, कोणत्याही थरातील मूल असले तरी त्याला कमी न लेखणे मूल बालरूपी परमेश्वर आहे या गोष्टीवर श्रद्धा असणे या गोष्टी तलमळीने साधल्या तर मुलांकडून पालकांच्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत.
            मूल जन्मलेल्या पहिल्या दिवसापासून स्वतः शिकतच असते. निरीक्षण, अनुभव, कल्पना, विचार व निर्णय ही पंचपदी मुलाला शिक्षण तेत असते. जन्मल्यापासून मूल भाषा शिकते, गणित शिकते सामान्यज्ञानही शिकते. आजच्या कोणताही विषय शिकत असते. ही गोष्ट जिव्हाळ्याच्या शिक्षकाला सतत दिसून येते. मुलाच्या मानसिक शक्ति वाढण्यास त्याच्या स्वाभिमानास धक्का लागता कामा नये हे व्रत संबंधितांनी पाळले पाहिजे. स्वाभिमानात शीला उगम आहे. पालक सच्छील बनण्यास मदत करणे त्याचा स्वाभिमान राखला तरच शक्य आहे. त्याप्रमाणेच पालकाला काही छंद असतात. छांदात विकासाचे केन्द्र साठविलेले असते. बालकांचे छंद जोपासले पाहिजेत व त्यातून त्याची प्रगत्ती नकळत साधली पाहिजे. यासाठी संबंधितांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे.मुलांना आपण शाळेत पाटवतो, मुले पुस्तकातून शिकतात. तयार करून परीक्षा पास होतात. ही परंपरा चाललीच आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर