● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Thursday 15 August 2019

भारतीय स्वातंत्र्य दिन: अदभूत क्षण



भारताच्या सुवर्णमयी स्वातंत्र्ययुगातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाहिलेले क्षण!!


आज भारताचा स्वातंत्र्यदिन! याच दिवशी तब्बल ७० वर्षांपूर्वी १५० वर्षांपूर्वीचे गुलामगिरीचे बंधन तोडून भारताने स्वातंत्र्याची पहाट अनुभवली. अगणित स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने पावन झालेला आपला स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला.
गोऱ्या साहेबांना आपण पिटाळून लावलं, एकीची ताकद त्यांना दाखवून दिली. पण जाता जाता त्या भेद्यांनी आपल्या अखंड घराचे दोन तुकडे केले.
असो, या शुभक्षणी ती कटू आठवण नकोच. तर मंडळी तुम्ही आम्ही काही ते सुवर्णयुग अनुभवलं नाही, तेव्हा नेमके काय ठेवणीतल्या गोष्टी घडल्या होत्या ते आपणास ठावूक नाही. पण तुमच्याही मनात उत्सुकता असलेच ना की काय काय घडले होते तेव्हा, चला तर आज तुमची ही इच्छा आम्ही पूर्ण करतोय.
आज आम्ही तुम्हाला तेव्हाच्या काळाचे काही निवडक आणि दुर्मिळ फोटो दाखवणार आहोत, चला तर पाहुया काय काय उलगडलं जातंय आपल्या समोर!
हा त्या पहिल्या सभेचा फोटो आहे, जेव्हा ८ फेब्रुवारी १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्यविषयक चर्चेसंदर्भात पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.
त्या ८ फेब्रुवारी १९४७ च्या नवी दिल्ली येथील सभेमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करताना पंडित जवाहरलाल नेहरू!


नवी दिल्ली येथे भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे घोषणापत्र वाचताना भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन


नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू




खुद्द व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन भारतीय ध्वजाला सलाम करतानाचे एकमेव छायाचित्र! शेवटी साहेबांना सलाम करावाच लागला!


आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले….!


१५ ऑगस्ट १९४७ रोजी लंडन येथील इंडिया हाउस वर भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकवण्यात आला.

अंदाजे ९० लाख मुस्लीम लोकांनी फाळणीनंतर पाकिस्तानचा मार्ग स्वीकारला.

आणि तब्बल ५० लाख हिंदू आणि शीख लोकांनी भारतात नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी भारताचा मार्ग धरला.


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वृत्तपत्रात छापलेली पहिली वहिली बातमी!

असे हे भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो…
जय हिंद….जय भारत!!!

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर