● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Saturday 2 February 2019

मोबाईल लहरी आणि नकळत होणारे आजार!

मोबाईल लहरी आणि नकळत होणारे आजार!

आजघडीला मोबाईल आपल्या जीवनातला अविभाज्य घटक. पण याच मोबाईलमुळे तुम्हाला नकळत काही विकारांना सामोरं जावं लागत आहे. मोबाईलमधून काही विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात. या लहरींमधून वातावरणातील विविध बदल आणि संवेदना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतात.

त्यानुसारच विविध संकेत मेंदूमार्फत विविध अवयवांना पोहोचतात. मोबाईल आणि अन्य उपकरणातून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी या शरीरावर परिणाम करतात. आज त्याबाबतीत सविस्तर जाणून घेऊयात... 

1) आजकाल मुलं मोबाईलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळतात. त्यामुळे मुलांची एकाग्रता, नवीन शिकण्याची क्षमता आणि ग्रहणशक्ती कमी होते. 

2) तासन्-तास फोनवर बोलणं नक्कीच धोकादायक आहे. जर आपणास फोनवर अधिक वेळ बोलायचं असेल तर हेडफोनचा वापर करा. फोन शरीरापासून जितका लांब ठेवता येईल तितका तो लांब ठेवा. शक्य असेल तर ब्ल्यूटूथ हेडसेटचा वापर करा.

3) अधिक गतीच्या चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा मोतीबिंदूसारखे विकारही होण्याची शक्यता असते.

4) अनेकांना डोक्याजवळ फोन ठेवून झोपण्याची सवय असते. या सवयीमुळे लोकांची झोप कमी होते. त्यामुळे रात्री झोपताना फोन शरीरापासून लांब राहील याची काळजी घ्या.

5) मोबाईल आणि अन्य उपकरणातून बाहेर पडणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी शरीरावर परिणाम करतात. याचा मुख्य परिणाम आसपासच्या पेशींना गरम करण्यावर होतो. याचबरोबर शरीराच्या अन्य अवयवांसाठीही या लहरी हानिकारक असतात.  

6) मोबाईलचा अतिवापर स्त्री आणि पुरुष यांच्या गुणसूत्रांवर आणि हार्मोन्सवरही होतो. परिणामी नपुंसकत्वही येऊ शकतं.

7) सध्या GSM आणि CDMAसीडीएमए असे दोन प्रकारचे फोन वापरात असतात. GSM (ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल कम्युनिकेशन) या प्रकारात मोडणाऱ्या फोनवर बोलत असताना साधारण 890 ते 915 हर्ट्झ तरंग टॉवरमधून मोबाईलपर्यंत जातात. CDMA फोनवर बोलताना 867 ते 849 हर्टझ लहरी उठतात. 

8) एकाच बाजूने मोबाईलचा अधिक वापर केल्याने त्या बाजूला ब्रेन ट्युमरसारखे आजारही होऊ शकतात.

9) अति फोन वापरामुळे थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चक्कर येणे, मळमळणे, तसंच पोट बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

10) कधी-कधी फोन न वाजताही फोन आल्याचा भास होतो. याला रिंगटोन एन्जायटी असेही वैद्यकीय भाषेत सांगितले जाते.

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर