● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Wednesday, 6 November 2019

कॅप्चा (CAPTCHA) म्हणजे नेमके काय?

कॅप्चा (CAPTCHA) म्हणजे नेमके काय?

सध्या अनेकांना विविध प्रकारे ऑनलाईन व्यवहार करावे लाअगतात. यामध्ये कधी वन टाईम पासकोड/पासवर्ड अथवा 'कॅप्चा' अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. वन टाईम पासवर्ड हा त्याच ग्राहकाच्या ऑनलाईन परिचयासाठी उपयोगी ठरतो तर 'कॅप्चा'मुळे कम्प्युटरसमोर माणूसच असून रोबोट्‌स नसल्याचे स्पष्ट होत असते. 'कॅप्चा'चा अर्थ

CAPTCHA - 'Completely Automated Public Turing Test to Tell Computers and Humans Apart' असा आहे. पूर्णतः स्वयंचलित असलेली ही एक शास्त्रीय चाचणी असून ही चाचणी मनुष्य आणि संगणक ह्यामध्ये फरक सिद्ध करते.

सर्वच ऑनलाईन व्यवहारात 'कॅप्चा' एक सुरक्षित दरवाज्याचे काम करतो. आता संगणक म्हंटले की सगळ्या गोष्टी ओटोमेटिक आल्यात.

संकेतस्थळावर आढळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत ऑटोमेशन करता येते. रेल्वेच्या साईटवर आपोआप घुसून तिकीट बुक करता येत, ऑनलाइन साईटवरून वस्तू विकत घेता येते. हे सगळे ऑटोमेशन, खूप डोक लावून बनवलेले अल्गोरिदम करतात, ज्यांना बोट्‌स (Bots) म्हणतात. जेव्हा तुम्ही एखादे संकेतस्थळ सुरु करता तेव्हा ते संकेतस्थळ पडताळणी करते की नक्की तुम्हीच आहात की एखादा बॉट छेडखानी करतोय. म्हणून हे पाहण्यासाठी संकेतस्थळ 'कॅप्चा' वाटेत सेट करुन ठेवते.

'कॅप्चा' वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ह्यात सोप्पा असा प्रश्न विचारला गेला असतो जो सोडवण्यासाठी थोड डोकं वापरावे लागते. जसे 230-110 बरोबर किती? दिलेल्या चित्रांपैकी मोटारसायकल असलेली चित्रे निवडा, चित्रांत दिसणारा कोड काय? इत्यादी. हे प्रश्न असे असतात की जे आपल्याला सोडवणे सोप्पे जाते परंतु बोट्‌सला सोडवणे कठीण. कारण बॉट म्हटला की एक ठराविक संगणक कोड जो ऐनवेळी बदलणे शक्‍य नसतो.

तरी काही बोट्‌स शिकतात आणि 'कॅप्चा' सहज सोडवतात म्हणून 'कॅप्चा' अनेकदा आडवा तिडवा, खराब झालेला, वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या प्रश्नाच्या रुपात आणि प्रत्येक वेळेस वेगळा दाखवतात जेणेकरून मानवी मेंदूच असे उत्तर देऊन शकेल आणि बॉट्‌सला ते जमले नाही पाहिजे.
गुगल आता नवीन 'कॅप्चा' वापरते. संभाव्य माहिती विनंती ही माणसाकडून केली जात आहे की संगणक बॉट काही छेडखानी करतोय ते चेक करायला. ह्यात फक्त आपल्याला 'I am not a robot' ह्या बटनाला टकटक करायचे असते. त्यासाठी आपल्याला हे वाक्‍य वाचावे लागते, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो आणि मग माउस कर्सर त्यावर नेऊन टकटक करावी लागते. ह्या सगळ्या स्टेप्स पाहिल्या जातात आणि ठरवले जाते की आपण मनुष्य आहात की रोबोट्‌स.


                       -----------///////----------- 

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर