● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Wednesday, 6 November 2019

बऱ्याच संकेतस्थळावरील कुकीज (Cookies) म्हणजे काय असते?

बऱ्याच संकेतस्थळावरील कुकीज ( Cookies ) म्हणजे काय असते?

जेव्हा जेव्हा आपण एखाद्या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा आपली त्याच संकेतस्थळावर परत जाण्याची शक्‍यता असते, मग अशा वेळेला आपल्याबद्दल थोडी माहिती ते संकेतस्थळ कुठेतरी साठवून ठेवत. ह्याला कुकीज (Cookies) म्हणतात.

एकाच संकेतस्थळाला असंख्य वापरकर्ते भेट देत असल्यामुळे ही माहिती त्याच्या ठिकाणी ठेवणे शक्‍य नसते म्हणून आपली माहिती आपल्याच संगणकात ब्राउजर द्वारे सुरक्षित ठेवली जाते. म्हणून बऱ्याच साईट 'आम्ही कुकीज वापरतो' असा संदेश दाखवतात. म्हणजेच ते आपल्या संगणकात 'आपली थोडी माहिती - कुकीज' साठवून ठेवतात. जी नंतर ते आपल्याला चांगली सेवा देण्यासाठी वापरतात.

कुकीजचा उपयोग काय?

ऑनलाइन विक्रेते झाले, सर्च इंजिन झाली, ऑनलाईन व्हिडीओ दाखवणारे संकेतस्थळ झाली, समाज माध्यमे झाली ह्यावर आपले सततचे येणे जाणे चालू असते. प्रत्येक वेळेस नवीन माहिती दाखवण्याएवजी, तुम्हाला काय आवडते - तुम्ही शेवटच्या वेळेस आमच्या संकेतस्थळावर काय पाहत होता, तुमचे नाव काय? अशी माहिती साठवली असता = तुम्ही जिथून बंद केले होते तेथून सुरु व्हायला कुकीज मदत करतात. उदाहरण : 'Remember Me' हा पर्याय.

ह्यामुळे जेव्हा आपण परत त्याच संकेतस्थळावर जाणार तर ह्यावेळेस आपल्याला परत आपली वैयक्तिक माहिती जसे की 'नाव, पासवर्ड, पत्ता' द्यावा लागणार नाही आणि ते संकेतस्थळ आपल्यासाठी हवे तसे आणि पाहिजे तिथून सुरु होईल. ही माहिती ते संकेतस्थळ आणि आपले ब्राउजर दोन्ही मिळून आपल्या संगणकात साठवून ठेवतात त्या माहितीला कुकीज म्हणतात. कुकीज दुसरे-तिसरे काही नसून टेक्‍स्ट फाईल असते म्हणजे अक्षरांच्या रूपातली माहिती असते.

कुकीज कसे काम करतात?

जेव्हा आपण ब्राउजर उघडून एखाद्या संकेतस्थळावर जायचा आदेश त्याला दिला की तो त्या संकेतस्थळाच्या सर्वरला दोघांनी साठवून ठेवलेली कुकीज पण पाठवतो. त्यात तुम्ही काय करत होता? तुमचे नाव काय? ब्राउजर कोणते आहे? कधी तुम्ही ह्या संकेतस्थळाला भेट दिली होती अशी माहिती असते. ही माहिती ते सर्वर पाहतात आणि साजेसे बदल करून आपल्याला त्यांचे संकेतस्थळ दिसते.

ज्यामुळे आपल्याला परत परत आपली माहिती देण्याची गरज नसते, परत परत नवीन सुरुवात करायची गरज नसते, आपल्याला दिसणाऱ्या जाहिराती आता बदलत असतात आणि आपल्याला असा भास होतो की 'मी जिथून हे बंद केले होते तिथूनच हे सुरु झाले आहे.' ही माहिती वापरून संकेतस्थळ आणि ब्राउजर आपल्याला उत्तोमत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करतात.


                          ---------////----------

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर