● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Monday, 5 August 2019

Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल❓

🔝 

Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल❓
👇🏻

जुलै/ऑगस्ट महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सगळ्यांचीच धावपळ सुरू असते. 31 ऑगस्ट ही रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. समजा तुम्ही 31 ऑगस्टच्या आत IT रिटर्न भरू शकला नाहीत तर तुमच्याकडे अजून एक संधी असते. त्या अवधीत तुम्ही दंड भरून रिटर्न भरू शकता.

फिस्कल इयर 2018-19साठी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2020. तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न फाइल करू शकला नाहीत तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटिस मिळू शकते. जरी तुम्ही 31 मार्च 2020 पर्यंत रिटर्न फाइल करू शकत असलात तरी तो जुलैमध्येच करावा. तुम्ही 31 ऑगस्ट 2019 नंतर आणि 31मार्च 2020 च्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न भरलात तर तुम्हाला दंड बसू शकतो.

🔘 किती पडेल दंड
👇🏻
तुम्ही 31 ऑगस्ट नंतर 31 डिसेंबर 2019 पर्यंत IT फाइल केलात तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही 1 जानेवारी 2020पासून 30 मार्च 2020पर्यंत रिटर्न भरलात तर तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स सेक्शन 234F चा समावेश झाल्यावर लेट फाइन अनिवार्य झालीय. याआधी हे सर्व असेसिंग अधिकाऱ्यांवर अवलंबून असायचं.

🔘 छोट्या करदात्यांना किती दंड

ज्यांची मिळकत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते 31 मार्च 2020 च्या आधी रिटर्न फाइल करत असतील तर जास्तीत जास्त लेट फी 1000 रुपये लागेल.

एखाद्या करदात्याची पूर्ण मिळकत टॅक्स स्लॅब सवलतीमध्ये येत असेल आणि त्यानं उशिरा रिटर्न भरले तर त्याला कुठलाही कर लागत नाही.

समजा एखाद्याला परदेशातल्या संपत्तीतून मिळकत होत असेल आणि ती व्यक्ती कर सवलतीच्या सीमेत असेल तरीही रिटर्न फाइल केल्यावर कर लागू शकतो.

🔚

फ्रेंडशिप डे

'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यामागचा 'हा' इतिहास❓
👇🏻
भारतात अनेक दिवसांपासून 'फ्रेंडशिप डे'ची प्रथा आहे. ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या पहिल्‍या रविवारी मैत्रीचे प्रतिक म्‍हणून 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. भारतात 4 ऑगस्ट रोजी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत असतात. मात्र, अनेकांना हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास माहित नसतो. चला तर मग जाणून घेऊयात...

'फ्रेंडशिप डे'चा इतिहास -
👇🏻
आपल्याकडे अलिकडेच 'फ्रेंडशिप डे'चे वारे वाहत असले तरी त्याची सुरुवात फार जुनी आहे.

'फ्रेंडशिप डे' दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय 'फ्रेंडशिप डे'चा प्रस्ताव 1958 मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर सुरुवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येऊ लागला.

भारतात तसेच दक्षिण आशियातील काही देशात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. मात्र काही देश 'फ्रेंडशिप डे' त्यांच्या सोयीच्या दिवशी साजरा करतात. 8 एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या 27 एप्रिल 2011 ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 30 जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे' म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर