● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Wednesday, 30 October 2019

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी

इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा परिचय


इंदिरा प्रियदर्शिनी गांधी… भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला प्रधानमंत्री व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या केंद्रबिंदु सुध्दा होत्या. इंदिरा गांधींनी 1966 ते 1977 व पुन्हा 1980 ते 1984 त त्यांच्या हत्येपर्यंत देशाची सेवा केली. सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर असण्याच्या बाबतीत त्या दुसऱ्या स्थानावर होत्या व प्रधानमंत्री कार्यालय सांभाळणाऱ्या आतापर्यंत त्या एकमेव महिला आहेत.



नाव (Name).        
इंदिरा फिरोज गांधी (Indira Gandhi)

जन्म (Birthday)19 नोव्हेंबर 1917,इलाहाबाद (उत्तर प्रदेश)

वडिल (Father Name)पंडित जवाहरलाल नेहरू

आई (Mother Name)कमला जवाहरलाल नेहरू

विवाह (Husband)फिरोज गांधी समवेत 1942

मृत्यु (Death)31 ऑक्टोबर 1984

इंदिरा गांधी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कन्या. इंदिरा यांनी आपल्या वडिलांच्या राष्ट्रस्तरीय संस्थांची 1947 ते 1964 पर्यंत सेवा केली. त्यांचे योगदान पाहाता त्यांना 1959 साली राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष बनविण्यात आले. 1964 साली त्यांच्या वडिलांच्या मृत्युपश्चात कॉंग्रेस पार्टीत नेता होण्याचा संघर्ष त्यांनी सोडला व लाल बहादुर शास्त्रींच्या सरकार मधे कैबिनेट मंत्री होण्याचा निर्णय घेतला शास्त्रीजींच्या मृत्युनंतर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधींनी मोरारजी देसाईंना पराभुत केले आणि भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री झाल्या.
एकमेव महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी राजनैतिक क्रूरता आणि अलौकिक केन्द्रीकरणा साठी देखील ओळखल्या जातात. पाकीस्तानच्या स्वातंत्र्याकरता त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला आणि पाकीस्तानच्या स्वातंत्र्य युध्दात त्यांना साथ दिली त्यामुळे पाकिस्तानला विजय प्राप्त झाला आणि बांग्लादेशाची निर्मीती झाली. इंदिरा गांधींनी 1975 ते 1977 पर्यंत देशात आणिबाणी जाहीर केली आणि सर्व राज्यांमध्ये याला लागु करण्याचे आदेश दिलेत.
1984 त ज्यावेळी इंदिरा गांधींनी पंजाबच्या हरमंदिर साहिब अमृतसर ला आदेश दिले त्यावेळीच त्यांच्या शिख अंगरक्षकाने त्यांची गोळया घालुन हत्या केली.

इंदिरा गांधींचे प्रारंभिक जीवन –

इंदिरा गांधींचा जन्म कश्मीरी पंडित कुटंूबात 19 नोव्हेंबर 1917 ला अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडिल जवाहरलाल नेहरू मोठे राजकारणी होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याकरता इंग्रजांसोबत राजनितीक स्तरावर युध्द केले. त्यानंतर त्या आपल्या राज्यसंघाचे प्रधानमंत्री आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणुन नियुक्त झाल्या इंदिरा ही जवाहरलाल नेहरूंची एकमेव कन्या (त्यांना एक लहान भाऊ होता परंतु त्याचे लहानपणीच निधन झाले) त्या आपल्या आई कमला नेहरूंच्या सान्निध्यात आनंद भवन येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. इंदिरा जी चे लहानपण एकाकी आणि उदास व्यतीत झाले.
त्यांचे वडिल राजकारणी असल्याने कित्येक दिवस घराबाहेर राहात असत. इंदिराजींना अधिक तर घरीच शिकवीण्यात येत असे अधुन मधुन त्या शाळेत जात असत. त्यांचे शिक्षण दिल्लीतील माॅडर्न हायस्कुल, सेंट ससिल्लिया आणि सेंट मेरी क्रिश्चियन काॅन्व्हेंट अलाहाबाद येथुन झाले. या शिवाय एकोले इंटरनॅशनल, जिनेवा, एकोले नौवेल्ले, बेक्स आणि पुपिल्स ओन शाळा, पुणे आणि मुंबई येथुन देखील इंदिरा शिकल्या आहेत. पुढे शिकण्याकरता इंदिरा शांतिनिकेतन च्या विश्वभारती महाविद्यालयात गेल्या.
प्रथम भेटीत रविन्द्रनाथ टागोर यांनी त्यांचे नाव प्रियदर्शिनी असे ठेवले तेव्हांपासुन त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणुन ओळखल्या जाऊ लागले. एक वर्षानंतर आपल्या आईच्या आजारपणामुळे त्यांनी ते विश्वविद्यालय सोडले पुढे त्या युरोपला निघुन गेल्या. युरोप येथे असतांना इंदिराजींचे आरोग्य बिघडले होते कित्येकदा डाॅक्टर त्यांना पहाण्याकरता येत जात असत.
लवकर बरे होऊन पुन्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची ईच्छा होती. नाजी आर्मी ज्या काळात युरोपला पराजित करत होती त्यावेळेला इंदिरा तेथे शिक्षण घेत होत्या.
इंदिराजींनी पोर्तुगालमधुन इंग्लंड ला जाण्याचा भरपुर प्रयत्न केला परंतु त्यांच्याजवळ 2 महिन्यांचेच स्टॅंडर्ड शिल्लक होते. परंतु 1941 ला अखेर त्या इंग्लंडला आल्याच आणि तेथुन आपले शिक्षण अर्धवट सोडुन त्या भारतात परतल्या पुढे त्यांच्या विश्वविद्यालयाने त्यांना सन्मानपुर्वक पदवी प्रदान केली. ग्रेट ब्रिटन ला राहात असतांना इंदिरा गांधी आपले भविष्यातील पति फिरोज गांधी यांना भेटल्या. त्यांची ओळख अलाहाबाद पासुन होती ते लंडन येथे अर्थशास्त्राचा अभ्यास करीत होते.
फिरोज गांधी जोरास्त्रियन पारशी परिवारातील होते. अलाहाबाद येथे या दोघांचा विवाह करण्यात आला. 1950 ला विवाह झाल्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होण्याच्या अभियानात वडिलांची वैय्यक्तिक सहाय्यक म्हणुन सेवा करू लागल्या. 1950 सालच्या अखेरपर्यंत इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पार्टीची अध्यक्ष म्हणुन सेवा केली.
केरळ राज्य वेगळे करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला परंतु 1959 ला सरकारने त्याला अस्विकृत केले. इंदिराजींचा हे करण्यामागे हा उद्देश होता की त्यांना एक साम्यवादी सरकार बनवायचे होते. 1964 साली वडिलांच्या मृत्युनंतर त्यांना राज्यसभेचा सदस्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. पुढे त्या लाल बहादुर शास्त्रींच्या कॅबीनेट सदस्य झाल्या व माहिती अभियान मंत्री देखील बनल्या.
1966 साली शास्त्रीजींच्या मृत्युपश्चात कॉंग्रेस पार्टीने मोरारजी देसाईंच्या ऐवेजी इंदिरा गांधींना आपली नेता म्हणुन स्विकारले. कॉंग्रेस पार्टी चे अनुभवी व्यक्ती कामराज यांनी इंदिराजींच्या विजयाकरीता त्यांना भरपुर सहाय्य केले. इंदिरा गांधी एक देशप्रेमी होत्या, देशसेवा त्यांच्या रक्तातच होती. त्या नेहमी म्हणायच्या
“तुम्हाला धावपळीत स्थिर राहाणे आणि विश्रामावस्थेत क्रियाशिल राहाणे शिकायला हवे”
याचा अर्थ मनुष्याने कोणतेही कार्य करत असतांना सचेतन मेंदुने करायला हवे आयुष्यात क्रियाशिल असणे जेवढे आवश्यक आहे तेवढाच विश्राम देखील गरजेचा आहे जेणेकरून आपण आपल्या मेंदुला अधिक क्रियाशील ठेवु शकु.

इंदिरा गांधींच्या कार्यावर एक दृष्टीक्षेप –

1930 साली सविनय कायदेभंग आंदोलना दरम्यान कॉंग्रेस च्या स्वयंसेवकांना मदत करण्याकरता त्यांनी लहान मुलांची ’वानरसेना’ स्थापीत केली. 1942 मध्ये ’चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतल्याने त्यांना कारागृहात जावे लागले. 1955 ला राष्ट्रीय कॉंग्रेस कार्यकारी सदस्य व 1959 ला राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
1964 मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहाद्दुर शास्त्री भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांच्याच कार्यकाळात इंदिरा गांधी सुचना व नभोवाणी मंत्री झाल्या. 1966 ला लालबहाद्दुर शास्त्रीजींच्या निधनानंतर इंदिराजींची पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या नकाशावर प्रथम महिला प्रधानमंत्री होण्याचा सन्मान मिळाला. 1969 साली कॉंग्रेस पार्टीत फुट पडल्याने जुन्या कॉंग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात सिंडिकेट कॉंग्रेस आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वात इंडिकेट कॉंग्रेस अश्या दोन पाटर्यांचा जन्म झाला. याच वर्षी त्यांनी पुरोगामी आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी ताकदीने सुरू केली. देशातील चैदा मोठया बॅंकांचे राष्ट्रीयकरण केले आणि संस्थानिकांच्या संस्था रद्द करण्याचा निर्णय घेतला.
1971 साली इंदिराजींनी लोकसभा विसर्जीत करून लोकसभेच्या सहाय्याने पुर्व निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकांमधे त्यांनी ’गरीबी हटाव’ ही घोषणा दिली. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमताने विजय प्राप्त झाला. कॉंग्रेस पक्षातील सर्व सुत्र त्यांच्या हाती आली आणि त्या कॉंग्रेस च्या सर्वोच्च नेत्या बनल्या.
भारतावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकीस्तानातील पुर्व बंगाल मधल्या पिडीत लोकांना स्वतंत्र करण्याकरता सैन्य सहाय्य देऊन इंदिराजींनी भारतव्देष्टया पाकीस्तानाचे ’बांग्लादेश’ आणि पाकीस्तान असे दोन तुकडे केले. त्याआधी इंदिरा गांधींनी पाकीस्तान आणि अमेरिकेतील चांगल्या संबधांना लक्षात ठेवत मोठया चतुराईने 1971 साली सोव्हिएत युनियन सोबत वीस वर्षांचा ऐतिहासीक असा मैत्री आणि परस्पर सहयोग करार केला. त्यांच्या या असामान्य कामगिरीला लक्षात घेता राष्ट्रपतींनी त्यांचा 1971 ला ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला.
1972 ला इंदिराजींनी पाकिस्तान समवेत व्दिपक्षीय ’शिमला करार’ करून आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले. 1975 ला अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींच्या रायबरेली मतदार संघातुन लोकसभेवर निवडुन येण्याला अवैध ठरविले. इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लागु केली. परंतु लोकशाहीवर पे्रम करणारी भारतिय जनता यामुळे नाराज झाली.
1977 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस हरली. स्वतः इंदिरा गांधींचा रायबरेली मतदार संघातुन पराजय झाला परिणामी जनता पक्ष विजयी ठरला परंतु त्या पक्षातील आणि सरकारमधील पार्टी घटकांमध्ये मतभेद असल्याने 1980 ला मुदतपुर्व झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला दैदिप्यमान यश मिळाले व इंदिराजी पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाल्या. 1982 साली दिल्लीत नवव्या आशियाई स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात त्यांचे महत्वपुर्ण योगदान होते.
1983 ला न्यु दिल्लीत अलिप्तवादी राष्ट्र परिषदेचे सातवे शिखर सम्मेलन पार पडले या परिषदेत राष्ट्र आंदोलनाचे नेतृत्व इंदिरा गांधींकडे सोपविण्यात आले. पाकिस्तान ने चिडविल्यामुळे पंजाबातील शिख अतिरेक्यांनी पंजाबात स्वतंत्र ’खलिस्तान’ नावाचे राष्ट्र निर्माण केले त्यामुळे त्यांच्यावर नुकसानकारक कार्यवाही केली जात होती. शिख अतिरेक्यांनी अमृतसर मधील सुवर्ण मंदिरा सारख्या पवित्र ठिकाणी शस्त्रास्त्र ठेवली त्यामुळे इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवले.
सैन्य कार्यवाही करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागले या घटनेमुळे शिख समुदायातील काही समाज दुखावला गेला परिणामी 31 ऑक्टोबर 1984 ला सतवंत सिंग आणि बेअंत सिंग या अंगरक्षकांनी इंदिराजींवर गोळया झाडुन त्यांची हत्या केली.

पुरस्कार: 1971 ला ’भारतरत्न’

वैशिष्टय:

  • भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
  • भारतरत्न मिळणारी पहिली महिला

इंदिरा गांधीं चा मृत्यु – 

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांचा मृत्यु झाला. “भारतीय नागरिकता एक उत्तम नागरिकता आहे जर एकाही नागरिकाकरता एखादे संकट निर्माण होते जरी ते एका समुदाय, जात, धर्म वा भाषा समुहावर असेल तर ते संकट आपल्या सर्वांकरीता आहे आणि सर्वात वाईट बाब ही की ही स्थिती आपल्या प्रतिष्ठेला कमीपणा आणते”

                                  ------//------

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर