'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यामागचा 'हा' इतिहास❓
👇🏻
भारतात अनेक दिवसांपासून 'फ्रेंडशिप डे'ची प्रथा आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्रीचे प्रतिक म्हणून 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. भारतात 4 ऑगस्ट रोजी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत असतात. मात्र, अनेकांना हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास माहित नसतो. चला तर मग जाणून घेऊयात...
'फ्रेंडशिप डे'चा इतिहास -
👇🏻
आपल्याकडे अलिकडेच 'फ्रेंडशिप डे'चे वारे वाहत असले तरी त्याची सुरुवात फार जुनी आहे.
'फ्रेंडशिप डे' दक्षिण अमेरिकेतील देशात खासकरून पॅराग्वेत मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय 'फ्रेंडशिप डे'चा प्रस्ताव 1958 मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर सुरुवातीच्या काळात भेटवस्तू आणि भेटकार्ड देऊन फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येऊ लागला.
भारतात तसेच दक्षिण आशियातील काही देशात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. मात्र काही देश 'फ्रेंडशिप डे' त्यांच्या सोयीच्या दिवशी साजरा करतात. 8 एप्रिलला ओहायोच्या ओर्बालिनमध्ये 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या 27 एप्रिल 2011 ला पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत 30 जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे' म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता.

No comments:
Post a Comment