🔘 PPF बद्दल माहिती
➖➖➖➖➖➖➖➖
अल्पबचतीला चालना मिळावी आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित परतावा मिळावा या हेतूने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - पीपीएफ) सुरवात 1968 साली झाली. बचतीला चालना मिळावी म्हणून या योजनेत गुंतवण्यात येणाऱ्या सगळ्या रकमेवर, व्याजावर आणि मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या सगळ्या रकमेवर कर सवलत देण्यात आली आहे. गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि त्याचबरोबर खात्रीशीर परतावा हवा असणाऱ्यांसाठी पीपीएफ हा गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. या योजनेत दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घकालीन गुंतवणुकीतून निवृत्तीसाठी मोठा निधी उभारता येऊ शकतो तसेच यातील गुंतवणुकीवर प्राप्तीकर सवलत मिळते.
कुणीही व्यक्ती राष्ट्रीयकृत बँकेत पीपीएफचे खाते काढून गुंतवणुकीला सुरवात करू शकतो.
गुंतवणुकीवरील व्याजाचे दर तीन महिन्यांनी ठरवले जातात.
पैसे परत मिळण्यासाठी भारत सरकारची हमी असल्याने गुंतवणूक पर्यायांमधील हा सगळ्यात सुरक्षित पर्याय मानला जातो.
समाधानकारक व्याजदर
कर सवलतीची फायदा
योजनेची वैशिष्ट्ये
खात्याचा कालावधी -
पीपीएफ खात्याचा कमीतकमी कालावधी 15 वर्षांचा असतो. त्यानंतर तो आणखी पाच वर्षे वाढवता येतो. तुम्ही हा कालावधी कितीही वेळा वाढवू शकता. फक्त तो पाच वर्षांच्या टप्प्यांमध्येच वाढवावा लागतो. खात्याची मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या आत खात्याची मुदत वाढवून घ्यावी लागते. 15 वर्षांचा कालावधी खाते सुरु झाल्याच्या तारखेपासून मोजला जात नाही तर खात्याला वर्ष झाल्याच्या तारखेपासून 15 वर्षांचा कालावधी मोजला जातो.
गुंतवणुकीची मर्यादा -
दरवर्षी खात्यात कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये भरता येतात. वर्षभरात बारा वेळा पैसे भरता येतात. म्हणजेच दरमहा गुंतवणूक करता येते. खाते चालू ठेवण्यासाठी वर्षातून एकदा तरी पैसे भरावे लागतात.
नामनिर्देशन -
खाते सुरु केल्यानंतर खाते चालू असण्याच्या काळात तुम्ही केव्हाही नामनिर्देशन म्हणून कुणाचेही नाव समाविष्ट करू शकता.
कर्ज/ रक्कम काढण्याची मुभा -
पीपीएफ खाते तीन वर्षे चालू राहिल्यानंतर त्या खात्यातील रकमेवर तुम्ही कर्ज काढू शकता. खात्यातील रकमेच्या जास्तीत 25 टक्के कर्ज मिळू शकते. खाते मॅच्युअर होण्याच्या आधी रक्कम काढायची झाल्यास खाते सुरु होऊन किमान सहा वर्षे झालेली असावी लागतात आणि पीपीएफच्या नियमानुसार कोणत्या कारणासाठी कर्ज हवे आहे त्याचा विचार करून कर्ज दिले जाते.
पीपीएफ खाते सुरु करण्यासाठीची पात्रता -
भारताचा नागरिक असणारी व्यक्ती.
अल्पवयीन व्यक्तीचे खाते असेल तर तिचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. पीपीएफचे एका व्यक्तीचे एकच खाते असावे लागते.
पीपीएफचे संयुक्त खाते काढण्यास परवानगी नाही. अनिवासी भारतीय व्यक्ती पीपीएफचे खाते उघडू शकत नाही. मात्र खाते सुरु असलेल्या व्यक्तीने अनिवासी भारतीय असा दर्जा प्राप्त केल्यास खात्याची मुदत संपेपर्यंत ते चालू राहते.
खाते उघडण्याची प्रक्रिया-
बँकेत किंवा टपाल कार्यालयात पीपीएफचे खाते उघडता येते. त्यासाठी पीपीएफचा फॉर्म ए असतो. ओळखपत्राचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा फॉर्म ए सोबत जोडावा लागतो. खाते उघडताना कमीत कमी शंभर रुपये भरावे लागतात. ते रोख किंवा धनादेशाद्वारे भरता येतात.
आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला की, तुमच्या नव्या खात्याचे पासबुक बँकेकडून तुम्हांला मिळते. त्यामध्ये पैसे भरल्याचा तपशील असतो. व्याज मिळाल्याचा आणि खात्यात एकूण किती रक्कम आहे, कर्ज काढले असेल, रक्कम काढली असेल तर त्याचा तपशील त्या पासबुकात वेऴोवेळी भरला जातो. ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रोसेस पूर्ण करून खाते काढता येते.
🙏🏻
No comments:
Post a Comment