● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Tuesday, 30 July 2019

कृत्रिम पाऊस


पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.

ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते. त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषून्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते. एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो.

Monday, 22 July 2019

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

कुणालाही अचानक पैशाची गरज लागली तर पहिला विचार मनात येतो तो पर्सनल लोन(वैयक्तिक कर्ज) घेण्याचा. अशावेळी आपली गरज भागवणे याला प्राधान्य असल्याने पर्सनल लोनसाठी किती व्याज द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. पर्सनल लोनसाठी काहीही तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. हे कर्जही तात्काळ मिळत असल्याने आणि तात्काळ गरज भागवायची असल्याने कोणीही व्याजदराचा विचार करत नाही. अधिक व्याजदराने हे कर्ज घेतलं जातं. मात्र, महाग कर्ज घेण्यापेक्षा पैसे उभारायचे इतरही मार्ग आहेत. थोडा शांतपणे विचार केल्यास पैशाची व्यवस्था होऊ शकते. कुठल्या मार्गाने पैसे उभारता येतील हे मार्ग आपण जाणून घेऊया.

● पीपीएफ

कोणत्याही व्यक्तीला बँकेत पीपीएफ खातं उघडता येतं . गरज पडल्यावर पीपीएफमधून कर्जही घेता येते .
पीपीएफच्या नियमानुसार , ज्या आर्थिक वर्षात पीपीएफ खातं उघडलं आहे त्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षापासून पाचव्या आर्थिक वर्षापर्यंत फॉर्म डी सह पासबुक देऊन कर्जासाठी अर्ज करता येतो . महाग पर्सनल लोनपेक्षा हा पर्याय चांगला आहे .

● ईपीएफ

पर्सनल लोनच्या तुलनेत हा पण एक चांगला पर्याय आहे. घर खरेदी करण्यासाठी आणि गृह कर्जाचा ईएमआय देण्यासाठी ईपीएफ खात्यामधील ९० टक्के रक्कम काढता येते . यासाठी तुम्ही ईपीएफओचे ३ वर्ष सदस्य असला पाहिजे . ईपीएफ खात्यातून स्वतःचे , बहीण , भाऊ किंवा मुलीचे शिक्षण , स्वतःचे किंवा मुलगा किंवा मुलीचे लग्न , उपचारासाठी , घर खरेदीसाठी किंवा घराचे कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेऊ शकता . हे कर्ज परतफेड करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत असते . कर्जाची परतफेड दर महिन्याला किंवा एकावेळी करू शकता .

● सोने तारण कर्ज

यामध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज मिळते.
गहाण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीवर कर्जाची रक्कम अवलंबून असते. आरबीआयच्या नियमानुसार, दागिण्यांच्या किंमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नाही. या प्रक्रियेत खूपच कमी पेपर वर्क असते. त्यामुळे ५ मिनिटातही कर्ज मिळू शकते.

● मुदत ठेवी

बँकांतील मुदत ठेवी (फिक्स्ड डिपाॅझिट) वरही कर्जाची सुविधा मिळते. सरकारी बँका, खासगी बँका आणि एनबीएफसी यांच्याकडून मुदत ठेवींवर कर्ज मिळते. मुदत ठेवीमध्ये असलेल्या रकमेच्या ९० टक्के कर्ज मिळू शकते.

● प्राॅपर्टी

गृहकर्जावरही कर्ज घेण्याची सुविधा मिळते. याला टाॅप अप कर्ज म्हणतात. समजा, तुम्ही ३० लाख रुपयांचं घर घेतलं तर तुम्हाला बँकेकडून ८० टक्के म्हणजे २४ लाख रुपये कर्ज मिळेल. त्यानंतर काही वर्षात तुमच्या घराची किमत वाढते. जर किंमत ५० लाख रुपयांवर गेली तर तुमची कर्ज घेण्याची पात्रताही वाढते. या घरावर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. जर तुम्ही गृहकर्जाची पूर्ण परतफेड केली तर तुम्हाला ते घर तारण ठेवूनही कर्ज मिळते.

● विमा

काही विमा कंपन्या जीवन विमा पाॅलिसीवर कर्ज देतात. जर तुमच्या पाॅलिसीवर कर्जाची सुविधा असेल तर विमा घेतलेल्या कंपनीकडून कर्ज मिळू शकते. मनी बॅक आणि युलिप योजनांवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. मात्र, युलिप पाॅलिसी बँकेकडे गहाण ठेवून कर्ज मिळू शकते. बहुतांश बँका जीवन विमा पाॅलिसीवर कर्ज देतात.


----//------///-----//------

का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे

● का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे ●

इन्कम टॅक्स रिटर्न(आयटीआर) भरण्याची ३१ जुलैपर्यंतची मुदत असते. या कालावधीनंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. 

जर तुम्हाला नोकरी, व्यवसायातून करमुक्त मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला आयकर (प्राप्तिकर)रिटर्न भरावा लागेल. आयकर रिटर्न भरणे आणि आयकर भरणे यामध्ये फरक आहे. आयकर रिटर्न भरण्याचा अर्थ म्हणजे सरकारला तुम्ही तुमचे उत्पन्न, खर्च, गुंतवणूक याची माहिती देणे हा आहे. आयकर रिटर्न भरल्यावर जर तुमचे उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला कर द्यावा लागेल . एका आर्थिक वर्षात जर उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे .

आर्थिक वर्षात जर तुमचे उत्पन्न फक्त शेती आणि शेतीशी संबंधित असेल, तसंच तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला आयकर रिटर्न भरावा लागणार नाही . ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ६० वर्षांच्या वरील नागरिकांसाठी ही मर्यादा तीन लाख रुपये आहे . तर ८० वर्षांच्या वरील नागरिकांसाठी ५ लाख रुपये आहे . पण तुम्ही झिरो रिटर्न भरू शकता . झिरो रिटर्नमुळे आयकर विभागाच्या नजरेत तुमचे रेकाॅर्ड चांगले राहील .

आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही . मात्र , उत्पन्नाचा एक ठोस पुरावा तुम्ही सादर केलेला असतो . जर तुम्ही रिटर्न दिलेल्या मुदतीत भरला नाही तर तुम्हाला मोठा दंड चुकवावा लागू शकतो . आयकर रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत . हे फायदे आपण जाणून घेऊयात .


१ ) कर्ज मिळणं सुलभ
जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर आयकर रिटर्न हा तुमचा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे . गृहकर्ज तसंच वाहन कर्जासाठी बँक तुमच्याकडे २ ते ३ वर्षांचे आयकर रिटर्न मागते . जर तुमच्याकडे आयटीआरची काॅपी असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल .


२ ) क्रेडिट कार्डसाठी
आयटीआरमुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल . क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.

३ ) व्यवसायासाठी लाभदायक
व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयटीआर महत्वाचे आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायचं असेल तर तेव्हाही आयटीआर दाखवावे लागते. कोणत्याही सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवण्यासाठी मागील ५ वर्षांचे आयकर रिटर्न द्यावे लागते.

४ ) व्यवहारांमध्ये फायदेशीर
मोठ्या पैशांच्या व्यवहारांमध्ये आयटीआरची मोठी मदत होते. वेळेवर आयटीआर भरल्यामुळे प्रॉपर्टी खरेदी- विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भिती राहणार नाही. नियमीत आयकर रिटर्न भरणारे लोक या भितीपासून दूर राहतील. 
५ ) टीडीएस क्लेम
तुमच्या उत्पन्नावर टीडीएस कापला असेल तर तो परत मिळवण्यासाठी आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे . जर तुम्ही फ्री लान्सिंग किंवा घरून काम करत असाल आणि तुमचे उत्पन्न करपात्र नसले तरीही तुम्हाला वेतन देणारा टीडीएस कापू शकतो. अशावेळी आयकर रिटर्न भरून तुम्ही टीडीएस रिफंड घेऊ शकता. 

६ ) अधिक विमा संरक्षण
तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा (टर्म प्लान) घ्यायचा असेल तर विमा कंपनी तुमच्याकडे आयटीआर मागू शकते. तुमच्या उत्पन्नाचा स्रोत माहिती करून घेण्यासाठी आणि नियमीत उत्पन्नाची खात्री होण्यासाठी विमा कंपनी आयटीआरवरच विश्वास ठेवतात.

७ ) व्हिजा मिळणं सोपं
जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआर महत्त्वाचे आहे. बहुतांशी परदेशी दुतावास व्हिजा अर्जात मागील २ वर्षांचे आयकर रिटर्न मागतात. जर तुमच्याकडे आयटीआर असेल तर इतर लोकांच्या तुलनेत तुम्हाला व्हिजा मिळणे सोपे होते. 

८ ) दंडापासून सुटका
आयकर रिटर्न भरण्यास वेळ लागला तर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो . वेळेवर आयटीआर भरून तुम्ही दंडापासून वाचू शकता. मुदतीत आयटीआर भरल्यास आयकर विभागाकडून नोटीस येण्याची भितीही राहणार नाही. 

९ ) वास्तव्याचा पुरावा
आयकर रिटर्नची काॅपी हा तुमच्या वास्तव्याचा ठोस पुरावा आहे . याचा वापर तुम्ही सरकारी कामातही करू शकता. तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तुम्ही वास्तव्याचा पुरावा म्हणून आयटीआर काॅपी देऊ शकता.

-----//-----//-----

Saturday, 20 July 2019

अपघाती मृत्यू : कायद्यातील तरतूदी

अपघाती मृत्यू : कायद्यातील तरतूदी
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल : अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय  : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणाऱ्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बऱ्याच वेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेतलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR Returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

Source - Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.
-------------------------------------------------------------------

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित 2 ही वर्षाचे पण फायलिंग करू शकता

*

Tuesday, 16 July 2019

PPF बद्दल माहिती


🔘 PPF बद्दल माहिती
➖➖➖➖➖➖➖➖

अल्पबचतीला चालना मिळावी आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित परतावा मिळावा या हेतूने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - पीपीएफ) सुरवात 1968 साली झाली. बचतीला चालना मिळावी म्हणून या योजनेत गुंतवण्यात येणाऱ्या सगळ्या रकमेवर, व्याजावर आणि मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या सगळ्या रकमेवर कर सवलत देण्यात आली आहे. गुंतवणूक सुरक्षित राहणे आणि त्याचबरोबर खात्रीशीर परतावा हवा असणाऱ्यांसाठी पीपीएफ हा गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. या योजनेत दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घकालीन गुंतवणुकीतून निवृत्तीसाठी मोठा निधी उभारता येऊ शकतो तसेच यातील गुंतवणुकीवर प्राप्तीकर सवलत मिळते.

कुणीही व्यक्ती राष्ट्रीयकृत बँकेत पीपीएफचे खाते काढून गुंतवणुकीला सुरवात करू शकतो.

गुंतवणुकीवरील व्याजाचे दर तीन महिन्यांनी ठरवले जातात.
पैसे परत मिळण्यासाठी भारत सरकारची हमी असल्याने गुंतवणूक पर्यायांमधील हा सगळ्यात सुरक्षित पर्याय मानला जातो.

समाधानकारक व्याजदर
कर सवलतीची फायदा

योजनेची वैशिष्ट्ये
खात्याचा कालावधी - 
पीपीएफ खात्याचा कमीतकमी कालावधी 15 वर्षांचा असतो. त्यानंतर तो आणखी पाच वर्षे वाढवता येतो. तुम्ही हा कालावधी कितीही वेळा वाढवू शकता. फक्त तो पाच वर्षांच्या टप्प्यांमध्येच वाढवावा लागतो. खात्याची मुदत संपल्यानंतर वर्षभराच्या आत खात्याची मुदत वाढवून घ्यावी लागते. 15 वर्षांचा कालावधी खाते सुरु झाल्याच्या तारखेपासून मोजला जात नाही तर खात्याला वर्ष झाल्याच्या तारखेपासून 15 वर्षांचा कालावधी मोजला जातो.

गुंतवणुकीची मर्यादा - 
दरवर्षी खात्यात कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपये भरता येतात. वर्षभरात बारा वेळा पैसे भरता येतात. म्हणजेच दरमहा गुंतवणूक करता येते. खाते चालू ठेवण्यासाठी वर्षातून एकदा तरी पैसे भरावे लागतात.

नामनिर्देशन -
खाते सुरु केल्यानंतर खाते चालू असण्याच्या काळात तुम्ही केव्हाही नामनिर्देशन म्हणून कुणाचेही नाव समाविष्ट करू शकता.

कर्ज/ रक्कम काढण्याची मुभा -
पीपीएफ खाते तीन वर्षे चालू राहिल्यानंतर त्या खात्यातील रकमेवर तुम्ही कर्ज काढू शकता. खात्यातील रकमेच्या जास्तीत 25 टक्के कर्ज मिळू शकते. खाते मॅच्युअर होण्याच्या आधी रक्कम काढायची झाल्यास खाते सुरु होऊन किमान सहा वर्षे झालेली असावी लागतात आणि पीपीएफच्या नियमानुसार कोणत्या कारणासाठी कर्ज हवे आहे त्याचा विचार करून कर्ज दिले जाते.

पीपीएफ खाते सुरु करण्यासाठीची पात्रता -
भारताचा नागरिक असणारी व्यक्ती.
अल्पवयीन व्यक्तीचे खाते असेल तर तिचे कायदेशीर पालक खाते उघडू शकतात. पीपीएफचे एका व्यक्तीचे एकच खाते असावे लागते.
पीपीएफचे संयुक्त खाते काढण्यास परवानगी नाही. अनिवासी भारतीय व्यक्ती पीपीएफचे खाते उघडू शकत नाही. मात्र खाते सुरु असलेल्या व्यक्तीने अनिवासी भारतीय असा दर्जा प्राप्त केल्यास खात्याची मुदत संपेपर्यंत ते चालू राहते.

खाते उघडण्याची प्रक्रिया-
बँकेत किंवा टपाल कार्यालयात पीपीएफचे खाते उघडता येते. त्यासाठी पीपीएफचा फॉर्म ए असतो. ओळखपत्राचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा फॉर्म ए सोबत जोडावा लागतो. खाते उघडताना कमीत कमी शंभर रुपये भरावे लागतात. ते रोख किंवा धनादेशाद्वारे भरता येतात.
आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला की, तुमच्या नव्या खात्याचे पासबुक बँकेकडून तुम्हांला मिळते. त्यामध्ये पैसे भरल्याचा तपशील असतो. व्याज मिळाल्याचा आणि खात्यात एकूण किती रक्कम आहे, कर्ज काढले असेल, रक्कम काढली असेल तर त्याचा तपशील त्या पासबुकात वेऴोवेळी भरला जातो. ऑनलाईन पद्धतीने केवायसी प्रोसेस पूर्ण करून खाते काढता येते.

🙏🏻

Friday, 12 July 2019

Village Planning


तुमच्या गावातील सरपंचांनी गावासाठी किती अनुदान गावाच्या विकासासाठी खर्च केलेला आहे त्या बद्दल खालील link वर click करून जाणून घ्या.

1) प्रथम वर्ष टाका 
2) राज्य 
3) जिल्हा 
4) तालुका 
5) गावचे नाव 
6) Get Report ला click  करा 



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर