● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Monday, 22 April 2019

जागतिक वसुंधरा दिन- २२ एप्रिल

जागतिक वसुंधरा दिन- २२ एप्रिल



वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू ष्टे पण हाव नाही’ अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित ! याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.

मूळ संकल्पना व सुरुवात

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा –हास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

आपण काय करू शकतो

  • सर्व प्रसारमाध्यमांतून समाजात जागृती करणे व माहिती पुरवणे
  • पर्यावरण मित्र गटांच्या (इको क्लब) सदस्यांना या विषयांवरील चित्रपट इ. दाखवणे.
  • प्रदर्शने, स्पर्धा, चर्चा इ. चे आयोजन
  • स्वत:ची जीवनशैली तपासून पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळणे.
  • स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण
  • अपारंपरिक योग्य उर्जास्रोतांचा वापर
  • पर्यावरण- संरक्षणासंबंधी विविध अभ्यासक्रमांची माहिती नेटवरून मिळवणे. भावी छंद तसेच करिअर जोपासण्यासाठी देखील याचा उपयोग होईल.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर