बहुजनांची वैदिकतेच्या गुलामीतून मुक्तीची पहाट म्हणजे महात्मा बसवेश्वराचा जन्म दिवस.
देशाच्या अतिप्राचीन संस्कृतीचा इतिहास लोप पावला होता सनातनी वैदिक व्यवस्थेच मोठ्या प्रमाणावर स्तोभ माजल होत.माणूस म्हणून माणसाच्या जगण्याला काहीच अधिकार नव्हता,माणसाचं जीवन जणू किड्या-मुग्या प्रमाणे भरकटून टाकलं होत. तथागताच्या जाण्यानंतर जणू आपल्या अधिकारासाठी सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी कोणीच आवाज उठवायला तयार नव्हत.पण त्या गुलाम झालेल्या व्यवस्थेची पुन्हा घडी बसवण्यासाठी,स्वअस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी बहुजनांच्या मुक्तीचा समतासूर्य जगतज्योति महात्मा बसवेश्वराचा जन्म बाराव्या शतकात अक्षय तृतीयांच्या दिवसी झाला आणि सबंध मानवतेची अस्मिता जणू जागी झाली.
समाज कर्मकांड ,जातिव्यवस्था ,पुरोहितशाहीच्या गाढ झोपेत झोपला होता ह्या वेगवेगळ्या प्रश्नाला एकाच वेळी वाचा फोडणारे जगातल्या कृतिशील ज्ञानाच सगळ्यात मोठ विद्यापीठ म्हणजे बसवपीठ होय.अहंकाराने ,मी पणाने अनेक राजे,राजवाडे नको तशा प्रकारे शासन करत होते पण जगात कधी नोव्हें पहिल्यादाच सामान्य जनतेच्या दुःखात सहभागी होऊन त्याचे दुःख आपले दुःख समजून गोरगरीबाणा आपल्या उराशी घेऊन कवटाळून मिठी मारून लढणारा पहिला पंतप्रधान म्हणजे विश्वगुरू महात्मा बसवेश्वर होत.अगदी लहानपणा पासूनच विद्रोही व परिवर्तनवादी विचारांची ज्वलंत मशाल म्हणजे बसव जीवन होत.वयाच्या आठव्या वर्षी बहुदेव उपासनेवरून केलेला विरोध असो किंवा जातीव्यवस्थेवरून दैनंदिन जीवनात केला जाणाऱ्या भेदभावाला दिलेला छेद असो.त्यागा शिवाय महापुरुष होतच नाहीत महात्मा बसवेश्वरांनी या जुलमी साखळ धनडाना तोडण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी अक्कानागमा सोबत घराचा त्याग केला आणि तेथून पुढे कुडलसंगम येथे जाऊन जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्वच धर्माचा आणि त्याच्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला. वेद, आगम,निगम,तर्क-वितर्क ह्या सर्वच संकल्पना पुरेपूर पने जाणून घेतल्या आणि त्याच्या लक्षात आलं की ह्या सर्वच संकल्पना मध्ये स्पष्ठ मानव समाज पायदळी तुडवला जातोय ,येथे दिन-दलितांचा शोषण होतय ,या व्यवस्थेची सर्व सूत्र प्रस्थापित पुरोहित वर्गाकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले यासोबत सर्वच घडमोडी जवळून पाहत असताना अतिशय प्रगल्भ पणे महात्मा बसवेश्वराणा समजू लागलं की ही कपोलकल्पित व्यवस्था या मानवी समाजाला थोतःड स्वर्ग-नरक नावाच्या कल्पनाच्या भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर शोषण करतंय ह्या सर्वच प्रश्नांनानी त्याच मन अगदी कवळून ,पेटून उठलं होत ह्यांच्या स्वार्थी आणि बरबटलेल्या अवस्थेतुन समाजाला बाहेर काढण्यासाठी महात्मा बसवेश्वराणी जीवनाची सुंदर संकल्पना मांडली.
सदाचार हाची स्वर्ग!अनाचार हाची नरक!
मानवी जीवणात नको असलेल्या घडमोडीना बाजूला सारत समविचारी लोकांची चळवळ सुरू केली.या माध्यमातून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन वाढीस लागला.मग तत्कालीन व्यवस्थेला प्रश्न निर्माण होऊ लागले मग ते मंदिरावरती गरीब व कनिष्ठ प्रवर्गातील लोकांना जाण्यासाठी असलेली बंदी असो ,शूद्रावरती लादण्यात आलेले नको तेवढ्या जाचक अटी व नियमावली हे सर्वच प्रश्न घेऊन लोक समतानायक बसवेश्वराकडे येऊ लागले अशा सर्वाना त्याचा तो अधिकार मिळवून देण्यासाठी जगातील सर्वात सुंदर व वैभवशाली विचार त्याच्या पुढे मांडला.
धनिक बांधती देवालय! गरीब पामर मी काय करू?
पाय हे तुझ्या मंदिराचे खांब आहेत
डोकं हे तुझ्या मंदिराचे सुवर्ण कळस आहे
शरीर हे तुझ्या मंदिराचा गाभारा आहे आणि
गळ्यात दिलेला इष्टलिंग हा तुझा परमात्मा आहे.
ज्याच्या देव त्याच्या गळ्यात यातून शोषणमुक्त समाजाची निर्मिती म्हणून पुरोहितशाहीला अगदी कृतीतून बाजूला सारल आणि येणाऱ्या काळात ही जीवन प्रणाली लिंगायत नावाचा धर्म म्हणून उदयास आली.सामान्य माणसाचा विचार हा सर्वात प्रभावी आणि महत्वाचा असतो हे महात्मा बसवण्णा जाणून होते म्हणून त्या सर्वांचा विचाराचा सन्मान व्हावा व समाज अंर्तमुख व्हावा म्हणून अनुभव मंडपाच्या माध्यमातून विचार विनिमय होऊ लागले त्याच सोबत सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले म्हणून ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जगातले पहिले केंद्र ठरले.यामाध्यमातून ३५० पेक्षा जाती-पोटजातीना त्यावेळी एकत्र केलं होतं तर आपण यावरून जाणू शकतो की वीसाव्या शतकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं होतं तर आजपासून नऊशे वर्षाखाली किती मोठी विषमता असेल त्यावेळी येवढं मोठं सामाजिक अद्वितीय कार्य केलं होतं.किती मोठी त्या विचारांची उंची, तो विज्ञानवादी दृष्टीकोन ,ती सामाजिक परिवर्तनाची लढाई आजही साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरते.कायक वे कैलास सिद्धांताच्या माध्यमातून कष्टकरी,कामकरी,श्रमिकांच्या मेहनतीला पहिल्यादा सन्मान पण महात्मा बसवण्णानी केला.येवढा मोठा महात्मा माझ्या भारतीय संस्कृतीत होऊनही येथील व्यवस्था या विचाराला शकडो वर्षांपासून दाबून ठेवत आहे.हा विचार एकीकडे जगमान्य झाला आहे.जग या विचारवरती नतमस्तक होतय. पण आमच्याच समाजातील काही लोक हा क्रांतीकारी विचार आजही जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण एकविसाव्या शतकात वाढलेल्या लिंगायत धर्म आंदोलनाच्या रूपाने ह्या विचाराचा मोठा उद्रेक झाला आहे.गेल्या कित्येक वर्षापासून कन्नड भाषेत बंदीस्त असलेला हा विचार महाराष्ट्रात महाराष्ट्र बसव परिषद,बसव समिती बंगळुरू च्या माध्यमातून पेरला जाऊ लागला आणि आज महाराष्ट्रसह देशात समतावादी बसव विचाराचा वणवा पेटला आहे.जगाच्या कल्याणाचा विचार आज तेवढ्याच वेगाने प्रसारित होत आहे.हीच खऱ्या अर्थाने विचाराची प्रसार करणारी त्या बहुजनांच्या नायकाची ,समतावादी महामानवाची ,महात्मा बसवण्णाची जयंती आहे.म्हणून पुनःच एकदा..
!!समस्त समाज बांधवांना महात्मा बसवण्णाच्या ९१३ व्या जयंतीच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा.!!
गुरू झाला तर बसवण्णा शिवाय गुरु नाही
लिंग झाला तरी बसवण्णा शिवाय लिंग नाही
जंगम झाला तरी बसवण्णा शिवाय जंगम नाही
प्रसाद झाला तरी बसवण्णा शिवाय प्रसाद नाही
असा उंच संघटित बसवण्णा
दीप संघटित बसवण्णा?
२१ व्या शतकाचा प्रेरणा स्रोत झालास की बसवण्णा.
शरणु शरणार्थी
No comments:
Post a Comment