● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Friday, 19 January 2018


हॉकी

हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.


राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.
साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. 'ब्लॅक हेथ' नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर