भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजर करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●
वाचनकट्टा
- Home
- मनाचे श्लोक
- पसायदान
- नकाशे
- RTE कलमे व अधिनियम
- शैक्षणिक व सहशालेय उपक्रम
- दिनविशेष
- शालेय समित्या
- सुविचार
- ओवी, म्हणी व गीते
- गड व किल्ले
- पारंपारिक सण
- महाराष्ट्रातील अभयारण्ये
- महाराष्ट्रातील मासिके
- आपला जिल्हा:एका दृष्टिक्षेपात
- माहितीचा अधिकार २००५
- शिक्षणाचा अधिकार २००९
- पारंपारिक खेळ: क्रीडा
- ऑडिओ कथा व पंचतंत्र गोष्टी
- गणित शिकायचंय ?
- विपश्यना साधना
- बालभारती:पाठ्यपुस्तके
- मराठी वर्णमाला व व्याकरण
- महत्वाचे शासन निर्णय
- महाराष्ट्र नागरी सेवा नियम
- My Creations
- राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना
- शालेय प्रकल्प
- स्टिकर्स
- मॅन्युअल्स / Manuals
- अध्ययन निष्पत्ती
- हिंदी बालगीते
- English Poems
- Marathi Books
- महत्वाचे लिंक्स
- संगीतमय पाढे
- योग व योगासने
- शिक्षणावर बोलू काही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment