● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

गट विमा योजना


गट विमा योजना “ राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 ” दिनांक 01 मे 1982 पासून अस्तित्वात आली.
ही योजना दिनांक 01 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या व त्यानंतर शासकीय सेवेत येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सक्तीची आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असतांना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे संरक्षण देणे व कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर बचतनिधीतील रक्कम देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेखाली जमा होणारी वर्गणी रुपये 15/- च्या पटीत वसूल केली जात होती. त्यामध्ये विमा निधीचे रुपये 4.50 समाविष्ट होते. परंतू शा. नि. वित्त विभाग क्र.ग.वि.यो.- 10.02 / प्र.क्र.30/ शाहमी, दिनांक 26/7/2002 नुसार गट विमा योजनेच्या वर्गणीचे दर दिनांक 01/01/2002 पासून सुधारीत करण्यात आले.
त्यानुसार या योजनेखाली जमा होणारी वर्गणी रुपये 30/- च्या पटीत वसूल केली जात होती.
त्यानंतर आता शा.नि. वित्त विभाग क्र. गवियो-1009/प्र.क्र.58/वर्गणी/विमा प्रशासन दि. 2/08/2010 नुसार गट विमा योजनेच्या वर्गणीचे दर दि.1/01/2010 पासून सुधारीत करण्यात आले आहेत. त्यानुसार आता रुपये 60/-च्या पटीत वसुल होणा-या वर्गणीत विमा निधीचे रुपये 18/- समाविष्ट आहेत.
त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असतांना ऑगस्ट 2010 व त्यानंतर निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रुपये 60,000/- एवढे विम्याचे संरक्षण एका घटकासाठी (Unit) मिळते. तसेच रुपये 42/- बचतनिधीत जमा होतात, ते शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर बचत निधीवर अनुज्ञेय असणा-या व्याजाच्या रकमेसह प्रदान केले जातात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या निरनिराळया गटांसाठी वर्गणीचे दर व त्याद्वारे मिळणारे विम्याचे संरक्षण खाली दर्शविल्याप्रमाणे आहे.

अ.क्र . गट मासिक वर्गणी (रुपये)   विम्याचे संरक्षण

1            गट “अ”  960                9,60,000/-


2            गट “ब”   480                4,80,000/-


3            गट “क”   120                2,40,000/-


4            गट “ड”    60                  60,000/-



No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर