● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Thursday, 8 October 2020

CBI, CID, NIA आणि IB म्हणजे काय ? या विभागांचे काम कोणते ?

CBI, CID, NIA आणि  IB म्हणजे काय ? या विभागांचे काम कोणते ?

एखादे मोठे प्रकरण घडले की आपल्या कानावर हमखास सीबीआय, सीआयडी असे शब्द कानावर पडू लागतात. गुन्हा घडल्यानंतर 'या विभागांना चौकशी करू द्या' अशी मागणी केली जाते. पण हे विभाग नेमके आहेत काय त्यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात याबद्दल बहुतेकांना माहीत नसते. आज या सर्व विभागांबद्दल जाणून घ्या...


CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग)

केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI) ही भारत सरकारची विशेष पोलिस आस्थापना आहे. 

▪️गुन्हे अन्वेषण विभाग गुप्तहेर खाते आहे. CBI ची  स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी झाली. 

▪️लाचलुचपत प्रतिबंध या विषयासंबंधी नेमलेल्या संथानम समितीने (1963) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती. 

▪️देशपातळीवरील हत्या, भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी सीबीआय करते.

▪️गंभीर गुन्ह्यांमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा केंद्र सरकारकडून चौकशीचा आदेश दिला जातो.

▪️ही विशेष पोलिस आस्थापना ते मुळात आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करतात.

▪️पण राज्य किंवा उच्च न्यायालय / सुप्रीम कोर्टाने शिफारस केल्यास विशेष प्रकरणांमध्ये ते इतर प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करू शकतात.

-----------------------------------------------------------

CID (गुन्हे अन्वेषण विभाग)

▪️गुन्हे अन्वेषण विभाग (Crime Investigation Department (CID) ची स्थापना ब्रिटिश सरकारने 1902 मध्ये केली होती.

▪️फिंगर प्रिंट ब्युरो, गुन्हे शाखा, अँटी नार्कोटिक्स सेल, मानव तस्करीविरोधी विभाग या विभागास चौकशीचा अधिकार असतो.

▪️CID चे प्राथमिक काम गंभीर गुन्हे, दंगली, खोटेपणा इत्यादींचा तपास करते. 

▪️सीआयडीचे प्रमुख हे अतिरिक्त संचालक पदाचे पोलीस अधिकारी असतात.

▪️हे राज्य पोलिसांना मौल्यवान बुद्धिमत्ता उपलब्ध करून देतात.

▪️CID हा विभाग राज्य विभागावर कार्यरत असतो. 

▪️CID ला राज्य सरकार किंवा हायकोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकते.

----------------------------------------------------

NIA (राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी)

▪️राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी एजन्सी 31 डिसेंबर 2008 रोजी अस्तित्वात आली.

▪️हे केंद्रीय काउंटर टेररिझम लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणून काम करते.

▪️एनआयएला बनावट नोटांसंबंधीत गुन्ह्यांच्या तपासाचेही अधिकार देण्यात आले आहेत.

▪️NIA दहशतवाद संबंधी गुन्ह्यांचा छडा लावते आणि त्यासाठी काम करते. 

▪️हत्यारांची निर्मिती आणि त्यांच्या विक्री संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही आता एनआयएला करता येतो.

IB (इंटॅलिजन्स ब्युरो)

▪️1885 मध्ये जगातील सर्वात जुनी गुप्तहेर संस्था अस्तित्त्वात आली. 

▪️1947 मध्ये हे केंद्रीय बुद्धिमत्ता ब्युरो म्हणून पुन्हा सुरू करण्यात आले. 

▪️दहशतवाद, गुन्हेगारी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयीची पार्श्वभूमी माहिती ही संस्था देते.

▪️भारतीय गुप्तहेर विभागही कार्यरत ठेवते.  

▪️मुत्सद्दी शपथ घेण्यापूर्वी ते सर्व प्रकारच्या गुप्तचर माहितीचा मुख्य स्त्रोत आहेत.


----------------////-------------

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर