● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Saturday, 1 September 2018

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

५ सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या एका महान शिक्षकाचा जन्म दिवस आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सरवानकडून सन्मान मिळविला ते महान शिक्षक म्हणजे  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. ५ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. त्यांनी उपराष्ट्रपती  आणि राष्ट्रपती असि दोन्ही पदे भूषविली. देशात आणि प्रदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना आदरणीय वाटत होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस ‘शिक्षकदिन ‘म्हणून पाळला जात होता.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी सतत पहिली श्रेणी मिळवून आपल्या बुद्धीची चमक दाखविली. त्यांचा तत्वज्ञान हा विषय अत्यंत आवडीचा होता. हा विषय घेऊन त्यांनी  बी.ए.च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाले. पुढे एम.ए.झाल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. १९२१ साली म्हैसूरला नवीन विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून गेले तेथून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. १९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या  ‘आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे ‘ साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली हती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जग प्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.

ऑक्सर्फर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते १९५२ मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर १९५२ ते १९६२ पर्यंत कार्यरत होते. नंतर १३ मे १९६७ या कालावधीत ते भारताचे रास्त्र्प्ति म्हणून कार्यरत होते. १९५२ ते १९६७ हि वर्षे त्यांनी हि दोन पदे सांभाळली. नंतर ते निवृत्त झाले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब बहाल केला.

धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता.स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्या आय्गाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाज्लेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारेहि त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ.राधाकृष्णन यांनी खर्या गुरूची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बोद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्याला सद्गुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्या मध्ये जागृत करतो त्यांनी शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्य पूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. डॉ.राधाकृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां !डॉ. राधा कृष्णन यांचे १६ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर